सोनालिकाची पहिल्या तिमाहीत आतापर्यंची सर्वोच्च ४० हजार ७०० ट्रॅक्टरची विक्री


पुणे : भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टरने शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजा पूर्ण करतानाच आपल्या प्रयोगशीलतेचा वारसा कायम ठेवला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये आपली घोडदौड कायम ठेवली असून आतापर्यंतची पहिल्या तिमाहीतील सर्वोच्च ४०,७०० ट्रॅक्टरची विक्री नोंदवत देशांतर्गत उद्योगाच्या वाढीलाही मागे टाकले आहे.

सोनालिकाच्या हेवी ड्यूटी ट्रॅक्टर आणि प्रदेशकेंद्रीत धोरणामुळे आर्थिक वर्ष २०२३ मधील वाढीचा वेग आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत अत्यंत सातत्याने चालू राहिली आहे. त्यामुळे येत्या हंगामासाठी तिची स्थिती मजबूत झाली आहे.

पावसाळ्याच्या हंगामाने देशातील प्रमुख भागांमध्ये वेगाने हातपाय पसरले आहेत. शेती आणि भूजल पुनर्भरणासाठी हे शुभ चिन्ह आहे. याशिवाय विविध सरकारी अनुदाने आणि एमएसपीची मदत यांमुळे शेतकऱ्यांना त्यांची शेती फायदेशीर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत.

शेतकऱ्यांना बळ देण्यात आघाडीवर असल्यामुळे सोनालिका ट्रॅक्टरला त्यांना आपल्या हेवी ड्यूटी ट्रॅक्टरच्या माध्यमातून सक्षम करण्याचा ध्यास आहे. त्यामुळे भारतात तंत्रज्ञानाने सक्षम केलेल्या मात्र परवडणारी शेतीची हमी मिळते. जगातील क्रमांक एकच्या ट्रॅक्टर उत्पादन कारखान्यात तयार केलेली सोनालिकाची २०-१२० एचपीमधील सर्वात व्यापक ट्रॅक्टर श्रेणी ही सध्या १५० पेक्षा अधिक देशांतील १४ लाख शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरली आहे.

इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, पावसाळा भारताच्या ८० टक्क्यापेक्षा अधिक भागांमध्ये अगोदरच पोचला असून ते एक शुभचिन्ह आहे कारण सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे जलसाठ्यांमध्ये पाण्याची पातळी वाढेल आणि कृषीसंबंधित कामांमध्ये सामूहिकरीत्या वाढ होईल.

याशिवाय सर्व खरीप पिकांसाठी नुकत्याच वाढलेल्या एमएसपीमुळे भारतीय शेतकऱ्यांना केवळ सुरक्षाच मिळणार नाही तर शेतकऱ्यांना विविध पिकांची पेरणी करण्यासही प्रोत्साहन मिळेल.

Post a Comment

0 Comments