पुणे : मॅथेमॅटिक्स टीचर्स ऑफ इंडिया असोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय गणित प्रतिभा स्पर्धेची (एनएमटीसी) तयारी करण्यासाठी फिटजी पुणे केंद्रातर्फे ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
गणितात पारंगत असणाऱ्या प्रशिक्षकांद्वारे ११ दिवसांची ही विशेष कार्यशाळा असणार आहे. मंगळवार, दिनांक २५ जुलै २०२३ पासून कार्यशाळा सुरु होणार असून त्याची नोंदणी २४ जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार असल्याची माहिती फिटजी पुणे केंद्र प्रमुख तसेच भौतिकशास्त्र विभाग प्रमुख राजेश कर्ण यांनी दिली.
मॅथेमॅटिक्स टीचर्स ऑफ इंडिया असोसिएशनतर्फे दरवर्षी राष्ट्रीय गणित प्रतिभा स्पर्धा (एनएमटीसी) आयोजित केली जाते. एनएमटीसी ही १९६८ साली सुरू झालेली पहिली अधिकृत प्रतिभा स्पर्धा आहे. या स्पर्धा दोन टप्प्यात (प्रिलिम्स + फायनल) आयोजित केले जातात आणि निकाल डिसेंबर महिन्यात घोषित केले जातात.
फिटजीतर्फे ही कार्यशाळा एनएमटीसी स्पर्धेत विशेष यश मिळविण्याच्या दृष्टीने खास डिजाईन केलेली आहे. एनएमटीसी स्पर्धेच्या तयारीसाठी लागणाऱ्या सविस्तर मार्गदर्शनाबरोबर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन येथे केले जाणार आहे.
संपूर्ण अभ्यासक्रमाचे सर्वात प्रभावी पद्धतीने पुनरावलोकन करण्याबरोबर अत्यावश्यक उजळणी आणि नियतकालिक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थी फिटजीच्या पुणे केंद्रात उपस्थित राहू शकतात. इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विभागवार स्वतंत्र बॅचेस असणार आहेत असे राजेश कर्ण म्हणाले.
कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी www.tinyurl.com/fpcnmtc या लिंकवर जाऊन नोंदणी करावी अथवा अधिक माहितीसाठी 89564 96135 / 89561 03216 / 89564 96132
0 Comments