पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊनकडून सिंहगड रोडवरील हिंगणे येथील निवासी मतिमंद विद्यालयातील विशेष मुलांना खेळणी, कपडे, स्कुलबॅग, बेडशीट्स, बूट व अर्थसहाय्य देण्यात आले.
लायन्स क्लबच्या माजी प्रांतपाल चंद्रकला शेट्टी व माजी प्रांतपाल बी. एल. जोशी यांच्या हस्ते हे वितरण झाले. निवासी मतिमंद विद्यालयाचे वसतिगृह अधीक्षक उमेश भोजापुरे यांनी मुलांसमवेत या देणगीचा स्वीकार केला.
कॅम्प भागातील लेडीज क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी लायन्स क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊनच्या अध्यक्षा रझिया पित्तलवाला, सचिव सबिना अरुण, कुलवंत नाथ, ज्येष्ठ पत्रकार विजय अंबाडे आदी उपस्थित होते.
0 Comments