एलआयसी म्युच्युअल फंडात आयडीबीआय म्युच्युअल फंड योजनांचे विलीनीकरण पूर्ण


पुणे : भारतीय मालमत्ता व्यवस्थापन उद्योगातील एक नामांकित एलआयसी म्युच्युअल फंडाने आयडीबीआय म्युच्युअल फंडाच्या योजनांचे विलीनीकरण यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. २९ जुलै २०२३ पासून योजनांचे हे विलीनीकरण अंमलात आले आहे.

यातून एलआयसी म्युच्युअल फंडाच्या उत्पादन प्रस्तुतीला बळकटी मिळण्यासह, ते वैविध्यपूर्णही बनले. शिवाय विस्तारात वाढीच्या दृष्टीने आणि देशातील एक अग्रगण्य म्युच्युअल फंड म्हणून उदयास येण्यासाठी व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एयूएम) वाढ साधण्याच्या ध्येयाशी सुसंगत हे विलीनीकरणाचे पाऊल पडले आहे. ३० जून २०२३ अखेर एलआयसी म्युच्युअल फंडाची मालमत्ता (एयूएम) १८,४०० कोटी रुपये होती, तर आयडीबीआय म्युच्युअल फंडाची मालमत्ता (एयूएम) ३,६५० कोटी रुपये होती.

विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर, आयडीबीआय म्युच्युअल फंडाच्या २० योजनांपैकी १० योजना एलआयसी म्युच्युअल फंडाच्या तत्सम योजनांमध्ये विलीन केल्या जातील आणि उर्वरित १० योजना एलआयसी म्युच्युअल फंडाद्वारे ताब्यात घेऊन स्वतंत्रपणे चालविल्या जातील.

ज्यामुळे या फंड योजनांची एकूण संख्या ३८ होईल. या विलीनीकरणामुळे, आयडीबीआय म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना एलआयसी म्युच्युअल फंडाच्या इक्विटी, डेट, हायब्रिड, सोल्युशन ओरिएंटेड थीम्स, ईटीएफ आणि इंडेक्स फंडांचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या उत्पादन श्रेणींमध्ये प्रवेश मिळेल.

योजनेचे विलीनीकरण यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल भाष्य करताना, एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. टी.एस. रामकृष्णन म्हणाले आम्ही भारतातील प्रमुख बाजारपेठांमधील गुंतवणूक गरजा पूर्ण करणारे वैविध्यपूर्ण म्युच्युअल फंड घराणे म्हणून सेवा देण्यासाठी आमच्या क्षमता विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहोत आणि आमच्या या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 

विलीनीकरणामुळे मिड-कॅप, स्मॉल-कॅप, गोल्ड फंड, पॅसिव्ह फंड इत्यादी श्रेणींमधील योजनांना बळकटीच्याआमच्या उद्दिष्टाची पूर्तता होते. विलीनीकरणामुळे आम्हाला बाजारपेठेत व्यापक उपस्थिती निर्माण करण्यात आणि आमच्या उत्पादनांना अधिक विस्तृत व वैविध्यपूर्ण बनविण्यास मदत होईल.

एकत्रित सामर्थ्य आम्हाला भरभराट होत असलेल्या मालमत्ता व्यवस्थापन उद्योगातील उभरत्या संधी मिळविण्यास आणि गुंतवणूकदार तसेच वितरण भागीदारांसाठी मूल्यवर्धनसाठी ते मदतकारक ठरेल.

ते पुढे म्हणाले, आमची दृष्टी संपत्ती निर्मितीमध्ये विश्वासू भागीदार बनणे आणि सर्वांसाठी पसंतीचे म्युच्युअल फंड घराणे बनण्याचे आहे. तीन दशकांहून अधिक काळ निधी व्यवस्थापित करण्याच्या आमच्या यशसिद्ध पूर्वकामगिरीमुळे आम्हाला गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित करता आलेला आहे. पुरेशा जोखीम नियंत्रण पद्धतींचा अवलंब करून दीर्घकालीन कार्यप्रदर्शनावर लक्ष केंद्रित करून आम्ही कार्य करत राहू.

Post a Comment

0 Comments