पुणे शहरातील ऑफिस स्टॉकमध्ये १० टक्क्यांचा हिस्सा असणार
पुणे : कॉलियर्सचा नवीन अहवाल 'पुणे - टेक-टॉनिक शिफ्ट टू फ्लेक्स' नुसार उत्तम गुंतवणूक आणि तंत्रज्ञान व इतर प्रमुख क्षेत्रांमधील प्रबळ मागणीमुळे पुण्यातील फ्लेक्स स्पेस स्टॉक २०२५ पर्यंत ८ दशलक्ष चौरस फूटांच्या पलीकडे जाण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये शहराच्या एकूण ऑफिस स्टॉकमध्ये १० टक्के हिस्सा असेल.
पुण्याच्या फ्लेक्स स्पेस बाजारपेठेत गेल्या पाच वर्षांमध्ये मोठी वाढ दिसण्यात आली आहे, ज्याचे श्रेय तरूणांची वाढती लोकसंख्या, मोठ्या टेक कॉर्पोरेट्सची उपस्थिती आणि अनेक स्टार्टअप्सच्या विस्तारीकरणाला जाते. ऑक्यूपायर्सच्या हायब्रिड कामाच्या शैलींनी विशेषत: महामारीनंतर शहरातील फ्लेक्स स्पेसेससाठी मागणीला चालना दिली आहे.
२०१८ पासून पुण्याच्या फ्लेक्स स्टॉकमध्ये चौपट वाढ झाली आहे आणि जून २०२३ पर्यंत ५.४ दशलक्ष चौरस फूट आहे. शहराच्या एकूण ग्रेड ए कार्यालयीन जागेमध्ये ८.३ टक्के हिस्सा आहे, जो अव्वल ६ शहरांमध्ये सर्वोच्च आहे. फ्लेक्स स्टॉकच्या आकारासंदर्भात संपूर्ण भारतात बेंगळुरू सर्वात मोठी फ्लेक्स स्पेस बाजारपेठ असली तरी पुण्याने ८.३ टक्क्यांसह फ्लेक्स स्पेस प्रमाणामध्ये बेंगळुरूला मागे टाकले आहे.
२०२३ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत शहरानुसार फ्लेक्स स्पेस प्रमाण (टक्क्यांमध्ये)
शहर | फ्लेक्स स्पेस प्रमाण * |
बेंगळुरू | ७.३ टक्के |
चेन्नई | ३.६ टक्के |
दिल्ली एनसीआर | ५.५ टक्के |
हैदराबाद | ६.१ टक्के |
मुंबई | ५.३ टक्के |
पुणे | ८.३ टक्के |
संपूर्ण भारत | ६.१ टक्के |
* स्रोत: कॉलियर्स
* टीप : डेटा ग्रेड ए इमारतींशी संबंधित आहे.
* फ्लेक्स स्पेस प्रमाण शहरातील एकूण ग्रेड ए ऑफिस स्टॉकमधील फ्लेक्स स्टॉकच्या हिस्साशी संबंधित आहे.
पुण्यातील कॉलियर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनिमेष त्रिपाठी म्हणाले, पुणे संपूर्ण भारतात लोकप्रिय टॉप फ्लेक्स स्पेस गंतव्य म्हणून उदयास आले आहे, जेथे शहराने गेल्या ५ वर्षांमध्ये मोठी वाढ केली आहे. भारतातील फ्लेक्स जागा भाड्याने देण्याच्या प्रमाणामध्ये पुण्याचा हिस्सा २०१८ मधील ५ टक्क्यांवरून २०२२ मध्ये २५ टक्क्यांपर्यंत अनेक पटीने वाढला आहे.
शहरातील फ्लेक्स स्पेसेससाठी ऑक्यूपन्सी पातळ्यांमध्ये देखील वाढ होत आहे, जेथे एंटरप्राइज आऊटसोर्सिंग महत्त्वाचे बनले आहे. ऑक्यूपायर्सच्या कार्यालयीन विस्तारीकरण धोरणामध्ये स्थिरता, मापनीयता व ऑप्टिमायझेशन 'अव्वलस्थानी' असल्यामुळे फ्लेक्स स्पेसेसना शहरामध्ये प्राधान्य मिळत राहिल. दर्जा, अधिक ऑप्टिमायझेशन व सोयीसुविधेवर अधिक लक्ष करण्यासह जागा भाड्याने देण्याच्या प्रमाणाला चालना मिळेल.
बाणेर-बालेवाडी व सीबीडीचा पुण्यातील फ्लेक्स स्टॉकमध्ये ७५ टक्के हिस्सा
पुण्यातील बाणेर-बालेवाडी व सीबीडीचा संपूर्ण भारतातील टॉप १० फ्लेक्स मायक्रो-मार्केट्समध्ये समावेश आहे, ज्यामध्ये बेंगळुरूमधील ओआरआर व एसबीडी १ (कोरमंगला, सीव्ही रमण नगर, आयआरआर, इंदिरानगर व इतर) आणि हैदराबादमधील एसबीडी (मधपूर, हायटेक सिटी, कोंडापूर व रायदुर्ग) यांचा समावेश आहे.
२०२३ च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत बाणेर-बालेवाडीचा पुण्यातील एकूण फ्लेक्स स्टॉकमध्ये ४४ टक्के हिस्सा आहे, ज्यानंतर सीबीडीचा ३१ टक्के हिस्सा आहे. कल्याणीनगर, मुंढवा व येरवडा हे सीबीडीमधील काही लोकप्रिय फ्लेक्स गंतव्य आहेत. अधिक पुढे जात,
विमाननगर व खराडी यांच्यामध्ये देखील पुढील २ ते ३ वर्षांमध्ये फ्लेक्स स्पेस विस्तारीकरणासाठी मोठी क्षमता आहे, ज्याचे श्रेय प्रबळ पुरवठा श्रेणी, उत्तमरित्या स्थापित पायाभूत सुविधा आणि प्रदेशामधील आगामी मेट्रो कनेक्टीव्हीटीला जाते.
0 Comments