के.के.वाघ इंजिनीरिंग कॉलेज येथे उत्साहात पार पडली कार्यशाळा
नाशिक : कल्पकता आणि सर्जनशीलता या यशामागील प्रेरक शक्ती असलेल्या जगात बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्त्व प्रचंड वाढलेले आहे. म्हणूनच भारत सरकारच्या "आझादी का अमृत महोत्सव" उपक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियान (NIPAM) संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांमध्ये IP जागरूकता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
के.के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक येथे नुकतीच स्टार्टअप्ससाठी बौद्धिक संपदा आणि आयपी व्यवस्थापन या विषयावर NIPAM च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळे दरम्यान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे प्रकल्प निदेशक डॉ. सुराज भोयर यांनी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला.
डॉ. सुराज भोयर पुढे म्हणाले की, IPR वर राष्ट्रीय कार्यशाळा हा NIPAM च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला एक महत्त्वाचा उपक्रम होता, ज्याचा उद्देश संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना आणि सर्जनशीलतेला चालना देण्याचा आहे. आम्हाला आशा आहे की असे उपक्रम यापुढेही आयोजित केले जातील आणि विद्यार्थी त्यांचा पुरेपूर लाभ घेऊन देशात नाविन्य आणि उद्योजकतेची संस्कृती निर्माण करतील.
बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्त्व आणि स्टार्टअप पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट आणि इतर प्रकारच्या बौद्धिक संपदा अधिकारांद्वारे त्यांचे नवकल्पना, निर्मिती आणि कल्पना कशा संरक्षित करू शकतात याबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षित करणे या कार्यशाळेचा उद्देश होता.
उपस्थितांनी आयपी व्यवस्थापन, परवाना आणि व्यापारीकरणाच्या मूलभूत गोष्टी जाणून घेतल्या. जवळपास 150+ विद्यार्थी सहभागींनी संपूर्ण कॅम्पसमध्ये आयपी अॅम्बेसेडर म्हणून काम करण्याची आणि बौद्धिक संपदेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता पसरवण्याची शपथ घेतली.
कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने अथक परिश्रम घेण्यात आले. या आयोजनात संस्थेची इनोव्हेशन कौन्सिल, ई आणि टीसी अभियांत्रिकी विभाग आणि येथील टीम एआयसीटीई आयडिया लॅब यांचा समावेश होता.
प्राचार्य डॉ.केशव नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, ईअँडटीसी इंजिनीअरिंगचे एचओडी प्रा. डॉ. दिनेश एम. चांदवडकर, आयआयसीचे अध्यक्ष प्रा.डॉ. गौरव डवरे यांनी मोलाची भूमिका बजावली.
बौद्धिक संपदा जागरूकता प्रोत्साहन आणि मजबूत करण्यासाठी झालेल्या या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील मोराडे यांनी केले. याशिवाय संपूर्ण संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये आयपी दाखल करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
0 Comments