पुण्याचे जितेंद्र राठी राष्ट्रीय मंत्री, तर सुमीत अंबेकर मिडिया प्रभारी पदी नियुक्त
पुणे : श्री अखिल भारतवर्षीय दिगम्बर जैन विद्वत् परिषदेच्या महाराष्ट्र विभागाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याचे जितेंद्र राठी राष्ट्रीय मंत्री, तर सुमीत अंबेकर मिडिया प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वांच्या सहमती आणि विचार विमर्श करून सदर महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक / कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अभय शास्त्री, देवलाली (राष्ट्रीय उपाध्यक्ष), डॉ. राकेश जैन, नागपूर (राष्ट्रीय उपाध्यक्ष), डॉ. महेंद्र जैन मुकुर, मुंबई (राष्ट्रीय उपाध्यक्ष), दीपक अथणे, सांगली (राष्ट्रीय उपाध्यक्ष) राष्ट्रीय मंत्री श्रुतेश सातपुते, नागपूर, विपिन शास्त्री, नागपूर, जितेंद्र राठी, पुणे, किशोर धोंगडे, मुंबई आदी पदाधिकारी सहभागी होते.
श्री अखिल भारतवर्षीय दिगंबर जैन विद्वत् परिषदेची स्थापना कलकत्ता येथे वीर शासन जयंती सन 1944 ला झाली. एक हजार पेक्षा जास्त विद्वान/ सभासद असलेली ही धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात जैन समाजातील कार्यरत असणारी देशव्यापी अग्रगण्य संस्था आहे. देशातील विविध ठिकाणी या संस्थेचे वार्षिक अधिवेशन होतात. काही दिवसापूर्वी विद्वत परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर डॉ. वीरसागर (दिल्ली), कार्याध्यक्ष पदावर डॉ. शांतीकुमार पाटील (जयपूर), तसेच राष्ट्रीय महामंत्री पदावर डॉ. अखिल बंसल (जयपूर) यांची निवड झाली होती.
कार्यकारिणी याप्रमाणे :
1. अध्यक्ष - संजय राऊत, औरंगाबाद
2. कार्याध्यक्ष - विक्रांत शहा, सोलापूर
3. उपाध्यक्ष - हेमंत बेलोकर, गजपंथा
4. महामंत्री- आलोक घोडके, कारंजा
5. सचिव - डॉ. नेमिनाथ बाळीकाई, बाहुबली
6. सह सचिव - अनिल आलमान, हेरले
7. कोषाध्यक्ष - अभिषेक जोगी, मुंबई
8. प्रचार सचिव - अनंत विश्वंभर, सेलू
9. संघटन मंत्री - नितीन कोठेकर,सांगली
10. महिला प्रकोष्ठ - प्रतिती पाटील - मोदी, नागपुर
11. मीडिया प्रभारी - सुमीत अंबेकर, पुणे, देवांग गाला, मुंबई.
12. प्रवक्ता - अमोल संघई, हिंगोली, डॉ. शुद्धात्मप्रकाश जैन, मुंबई
13. प्रचार प्रमुख - चिंतामन भुस, कारंजा, जितेंद्र जैन, मुंबई
14. जिला संघटक - प्रशांत मोहरे, (सोलापुर), रवींद्र मसलकर, (जालना), राहुल जैन (मुंबई), वीतराग वसवाडे (नागपूर), दीपक डांगे (चन्द्रपुर)
0 Comments