१३०० कोटी रुपयांची संभाव्य क्षमतेसह कोलते-पाटील यांचे पुण्यात दोन नवीन निवासी प्रकल्प सुरू

प्रकल्पाची अंदाजे विकसनक्षमता ७.५ लाख चौ. फूट; ४०० कोटी रुपयांची महसूल क्षमता


राहूल तळेले,
सीईओ, कोलते-पाटील डेव्हलपर्स लि., पुणे


पुणे : एकूण अंदाजे विक्रीयोग्य क्षेत्रफळ १.९ दशलक्ष चौरस फूट आणि १,३०० कोटी रुपयांची अग्रणी क्षमता यांसह मुंबई आणि बेंगळुरूमध्ये आपले स्थान वाढवत असलेली पुण्यातील अग्रगण्य बांधकाम व्यवसाय कंपनी कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड ने पुण्यात दोन नवीन निवासी विकास प्रकल्पांवर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती कोलते-पाटील डेव्हलपर्स लि.चे ग्रुप सीईओ राहुल तळेले यांनी दिली.

तळेले यांनी पुढे सांगितले की, हे प्रकल्प पुण्यातील वाघोली  (नगर रोड) आणि एनआयबीएम रोड (कोंढवा) येथे आहेत. हे पाऊल पुण्याच्या उच्च संभाव्य मायक्रो मार्केटमध्ये आपले नेतृत्व स्थान आणखी मजबूत करण्याच्या दिशेने कंपनीच्या प्रयत्नांना सूचित करते.

तसेच पुणे ही आमची सुरुवातीपासूनच प्रमुख बाजारपेठ आहे आणि आम्ही शहराच्या क्षमतेबद्दल आशावादी आहोत. मजबूत शहरी पायाभूत सुविधा, जीवनमानाच्या गुणवत्तेची उच्च क्षमता, राहणीमानाचा वाजवी खर्च आणि वाढत्या दरडोई उत्पन्नाला विविध क्षेत्रातील मजबूत रोजगाराच्या संधींचे पाठबळ यांनी पुण्याच्या वाढत्या निवासी बांधकाम व्यवसाय बाजारपेठेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

एका महत्त्वपूर्ण घडामोडीमध्ये आम्ही आकर्षक ठिकाणच्या दोन नवीन प्रकल्पांवर स्वाक्षरी केली असून त्यामुळे पुण्याच्या उच्च संभाव्य सूक्ष्म बाजारपेठांमध्ये खोलवर स्थान निर्माण करण्यास अनुमती मिळाली आहे. शहरातील कामकाजाच्या बाबतीत तीन दशकांहून अधिक काळ तयार केलेल्या आमच्या मजबूत ब्रँड इक्विटीचा लाभ घेत आम्ही हे व्यवहार कमी आगाऊ गुंतवणुकीसह संरचित केले आहेत.

भांडवलावरील परताव्याच्या अनुकूलतेच्या दृष्टीकोनातून कमी भांडवलाची तीव्रता राखून बाजारपेठांमध्ये वाढ घडवून आणण्याच्या आमच्या उद्दिष्टाशी हे सुसंगत आहे. आम्ही पुण्यातील आमचे अग्रणी स्थान मजबूत करण्यासाठी उत्सुक असून आमच्या सर्व भागधारकांसाठी हे शाश्वत मूल्यात परावर्तित करताना बघत आहोत, असेही तळेले म्हणाले.


प्रकल्प तपशील याप्रमाणे:

 

अनु क्र.

पुणे

व्यवहार प्रकार

विक्रीयोग्य क्षेत्र (लाख चौ. फूट)

अग्रणी क्षमता (कोटी रुपयांत)


१.    


वाघोली  (नगर रोड)


आऊटराइट


७.५


००



२.    


एनआयबीएम रोड (कोंढवा)


संयुक्त प्रकल्प


११.५


९००


Post a Comment

0 Comments