पुणे : अग्रगण्य ग्राहक तंत्रज्ञान कंपनी ऊडचलोने ‘वीरबाईक’ नावाची वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रिक सायकल सादर केली आहे.
सशस्त्र दलांमुळे प्रेरित झालेल्या सर्व भारतीयांसाठी शाश्वत आणि परवडणारे वाहतुकीचे पर्याय सादर करण्यासाठी कंपनीने हे पर्यावरण पूरक वाहन सादर केले आहे. "वीर" हे नाव भौतिकशास्त्रातील ओहमचा नियम V=IR वरून प्रेरित आहे. इलेक्ट्रिकल सर्किटमधील व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यांच्यातील संबंध यातून सूचित होतो. तसेच आपल्या सैनिकांसारखा जो धाडसी आणि शूर असतो अशा माणसाला ‘वीर’ असे म्हणतात.
ई-बाईक बद्दल बोलताना वीरबाईकचे सह-संस्थापक आणि संशोधन विकास प्रमुख साहिल उत्तेकर म्हणाले, ‘वीरबाईक’ ही एक उच्च-कार्यक्षमता असलेली इलेक्ट्रिक सायकल असून आरामदायी आणि सुलभ राइड पुरविण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
ही बाईक केवळ पर्यावरण पूरक आहे असे नाही तर कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठीही डिझाइन केलेली आहे. ती आयपी रेटेड ६५ आणि ६७ आहे. टिकाऊ हलक्या वजनाच्या चौकटीसह, इलेक्ट्रिक कट ऑफसह असलेले डिस्क ब्रेक आणि अॅडजस्ट करता येण्याजोग्या सीट आहे.
सादरीकरणाबद्दल बोलताना ऊडचलो चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार म्हणाले, “वीरबाईक ही एक अभिमानास्पद नवकल्पना असून ती पूर्णपणे भारतात संकल्पित आणि विकसित केली गेली आहे. यातून स्वदेशी संशोधन आणि विकासासाठी असलेली आमची बांधिलकी दिसून येते.
आमचे ध्येय आमच्या ग्राहकांना शाश्वत, परवडणारे आणि टिकाऊ वाहतुकीचे पर्याय प्रदान करणे हे नेहमीच राहिले आहे आणि ‘वीरबाईक’ हे त्या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
0 Comments