पुणे : हिंजेवडी येथील हॉटेल हयात प्लेस या ठिकाणी Musique Magazine चे प्रकाशन शनिवार दि. १ एप्रिल रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी Musique Magazine चे प्रमुख पंकज सातव, इव्हेंट होस्ट हायर प्लेस हिंजवडीचे दिव्य माथूर, मार्केटिंग हेड वासुदेव लेटे, कास्ट इंडिया कंपनीचे प्रद्युम्न बापट, ड्रीम प्लॅनर इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या सह कौशिक नाईक आणि आर्यन वेताळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
पुणे, मुंबई, नाशिक, नगर संपूर्ण महाराष्ट्रातील नवोदित टॅलेंटला व्यासपीठ देण्यासाठी कलाकार फॅक्टरी गेल्या सात वर्षांपासून राज्यात कार्यरत आहे. कलाकार फॅक्टरी मधील शेकडो मुले-मुलींनी आज टेलिव्हिजन, फिल्म आणि मॉडेलिंग इंडस्ट्रीत आपला ठसा उमटविला आहे. अश्या टॅलेंटच्या यशोगाथा व नवोदिकांना संधी देण्यासाठी Musique Magazine आम्ही सुरू करत आहोत, अशी माहिती संचालक पंकज सातव यांनी दिली.
आतापर्यंतच्या व्यायसायिक प्रवासामध्ये नेहमीच सहकार्य करणारे मित्र, हितेषि, कौटुंबिक व नातेवाईक यांचा सत्कार करून पंकज सातव यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सदर सोहळ्यासाठी काही कलाकार, मॉडेल्स देखील उपस्थित होते.
0 Comments