ट्विन्स आणि मिसमॅच डे साठी विद्यार्थ्यांनी सादर केली कल्पकता
पुणे : भारतीय संस्कृतीच्या विविध वेषभूषांचा सर्जनशीलतेचा वारसा जतन करण्याच्या हेतूने कन्नड संघ पुणे संचलित कावेरी कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे 'मूड कावेरी २०२२-२३' अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये पहिल्या दिवशी 'पारंपारिक दिन' (ट्रॅडिशनल डे) आणि दुसऱ्या दिवशी ट्विन्स व मिसमॅच डे असे कार्यक्रम विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करित भारतातील विविध प्रांतातील संस्कृतींचे दर्शन घडवीत उत्तम प्रतिसाद दिला.दुसऱ्या दिवशी ट्विन्स डे आणि मिसमॅच डे साठी विद्यार्थ्यांनी विविध कल्पना आणि वेषभूषा सादर करित आपली कल्पकता दाखविली.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन व परीक्षक म्हणून निवड समिती सदस्यांनी काम पाहिले.
प्राचार्य डॉ.अशोक अग्रवाल व उपप्राचार्या डॉ.मुक्ता करमरकर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना देखील प्रशस्तिपत्रक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सुचिस्मिता मोहंती आणि त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि सादरीकरण उत्तमरीत्या केले आणि विद्यार्थ्यांनी याचा संपूर्ण आस्वाद घेतला.
0 Comments