वारजे येथील माॅडर्न काॅलेजमध्ये पार पडले माॅक बँकिंग



पुणे : प्रोग्रसिव्ह एज्यूकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय वारजे येथे 28 मार्च 2023 रोजी मॉक बँकिंग हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन वैकुंठ मेहता इंस्टीट्यूट फाॅर को-आॅपरेटिव्ह मॅनेजमेट (वॅमनिकाॅम) चे प्रोफेसर ए. के. तिवारी यांनी केले. यावेळी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वर्षा बापट व मॉडर्न मराठी मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका चिंचोलकर व शिक्षिका वैदेही शेटे उपस्थित होत्या.

उद्घाटनावेळी प्रोफेसर तिवारी यांनी विद्यार्थ्यांना बँकेचे महत्त्व तसेच ATM बद्दल ची माहिती दिली व कोणतेही पासवर्ड कोणाशीही शेअर न करण्याचा सल्ला दिला, तसेच. यानंतर मॉडर्न वरिष्ठ महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी 8 वी व 9वी च्या विद्यार्थ्यांना बँकेबद्दल माहिती दिली.


यात बँकेचे वेगवेगळे प्रकार व बँक खाते कसे उघडावे त्यासाठी लागवयाची कागदपत्रे तसेच चेक चे प्रकार अशी संपूर्ण माहिती दिली व त्यांनी विदर्थ्यांकडून पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठीची स्लीप ही भरून घेतली. तसेच ऑनलाईन बँकिंग पद्धतीमध्ये कोणत्याप्रकारची काळजी घेतली पाहिजे आपले ओपीटी व पिन कोणाशीही शेअर करू नका असे आवाहन ही त्यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय हे प्रा. प्रिया सामक, प्रा. ॲड. वैशाली कुलकर्णी, प्रा. शौनक माईणकर यांनी केले. हे सर्व उपक्रम प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा.डाॅ. गजानन एकबोटे, सचिव  प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह डाॅ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह डाॅ. निवेदिता एकबोटे, व्हीजिटर प्रा.पल्लवी जाधव आणि प्राचार्या डाॅ. वर्षा बापट यांच्या मार्गर्शनाखाली झाले.


Post a Comment

0 Comments