पुणे : शेतकऱ्यांच्या सर्वात अनोख्या मागण्या पूर्ण करत आणि पूर्ण वर्षभर जगभरात आपल्या आश्वासनांची पूर्तता करत, इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडने (आयटीएल) आर्थिक वर्ष २३ चा धडाकेबाज प्रवास पूर्ण केला आहे.
भारतातील नंबर एक ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या आयटीएलने आपल्या प्रयोगशील वाटचाल आणि शेतकरीकेंद्रित दृष्टीकोनाचा पूर्ण वापर करून आजवरच्या १५११६० ट्रॅक्टर्सच्या सर्वात मोठ्या वार्षिक विक्रीची नोंद केली आहे. या नेत्रदीपक कामगिरीमुळे कंपनीकडे तब्बल १४.१ टक्के मार्केट शेअर आला असून त्यात एकूण ११ टक्के वाढीचा समावेश आहे.
बाजारपेठेच्या अनपेक्षित गरजा हे भारताच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर बाजारपेठ असून देशातील वैविध्यपूर्ण पीक आणि मातीच्या परिस्थितीमुळे अनेक गरजा निर्माण होतात. आयटीएलने नेहमीच नाविन्यपूर्ण ट्रॅक्टर सादर करून अगदी अत्यंत वेगळ्या अत्यावश्यक परिस्थितींना तोंड देण्यासाठी आपल्या चॅनेल भागीदारांसोबत पावले टाकण्याची काळजी घेतली आहे.
विक्रीचा हा नवीन उच्चांक हा वन-स्टॉप फार्म सोल्यूशन पुरवठादार म्हणून शेतकऱ्यांचा आयटीएलवरील वाढता विश्वास आणि जगभरातील शेतकऱ्यांच्या आनंदाची हमी घेण्याची कंपनीचे वचन अधोरेखित करतो.
या आदर्श कामगिरीबद्दल आपले विचार मांडताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले की, आर्थिक वर्ष २३ हे आयटीएलमधील हे सर्वात मोठे वर्ष आहे कारण यंदा आम्ही आमची सर्वाधिक वार्षिक १५११६० ट्रॅक्टरची विक्री नोंदवली आहे, हे जाहीर करताना मला आनंद होतो.
आमच्या दृष्टीने एक लाख वार्षिक ट्रॅक्टर विक्री केल्यानंतरचा हा दुसरा सर्वात मोठा मैलाचा दगड आहे. उत्पादनातील नाविन्यपूर्णतेवर आमचे असलेले काटेकोर लक्ष, ट्रॅक्टर उद्योगात पारदर्शकता वाढवणाऱ्या वेबसाइटवर ट्रॅक्टरच्या किमती उघड करण्यातील पुढाकार, आमच्या एनबीएफसीद्वारे शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे, आयटीआयसारख्या तांत्रिक संस्थांमधील ३००० प्लस तरुणांचे ऑन-बोर्डिंग, डिजिटलायझेशन आणि ऑन-ग्राउंड शेतकऱ्यांशी कनेक्ट अशा अनेक उपक्रमांमुळे या नवीन ऐतिहासिक कामगिरीला चालना मिळाली आहे.
नव्या ऊर्जेने भरलेल्या रणनीतींसह, आमच्या टीम आणि चॅनेल भागीदार पुढे जाताना आणखी नवीन व मोठे टप्पे साध्य करण्यासाठी सज्ज आहेत.
0 Comments