संविधानाच्या एक लाख प्रती वाटपाच्या उपक्रमाची झाली सुरुवात

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचा उपक्रम



पुणे : भातरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने आयोजित एक लाख संविधानाच्या प्रती निःशुल्क वाटपाच्या उपक्रमाची सुरवात बुधवार १२ एप्रिल रोजी करण्यात आला.

या प्रसंगी आंबेडकर संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, सागर पानसरे हर्षद दौंडकर, अॅड. मंदार जोशी, प्रवक्ते संदीप खर्डेकर, ध्रव जगताप, बामणे सर, मुक्ता बर्वे, भालेकर सर, संदीप बेलदरे इत्यादी उपस्थित होते.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. भारतरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये संविधानाच्या एक लाख प्रती निःशुल्क वाटण्याचा संकल्प संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.

बुधवारी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, चाटे पब्लिक स्कूल, महात्मा गांधी विद्यालय, अभिनव विद्यालय, सनब्राईट स्कूल इत्यादी शाळांना संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.  



Post a Comment

0 Comments