ऋत्विक धनवट यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिवपदी निवड

पुणे : पुणे शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस ऋत्विक औदुंबर धनवट यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी निवड करण्यात आली आहे.


काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते पुण्याचा काँग्रेस भवन येथे नियुक्ती पत्र देण्यात आले, या वेळी पुणे काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे, विकास लांडगे, युवक काँग्रेस चे अध्यक्ष राहूल शिरसाट व पुणे युवक काँग्रेस ची टीम उपस्थित होती.


एका सामान्य घरातील मुलाला  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी नियुक्त करूण राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली म्हणत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल नितीन राऊत, विकास लांडगे व पुणे शहराध्यक्ष राहूल शिरसाट यांचे आभार मानले. 

या नव्या जवाबदारी चे स्वागत करत सुशिक्षीत तरुणांनी राजकारणात यावे असे मनोगत ऋत्विक औदुंबर धनवट यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments