सोलिस ट्रॅक्टर्स अँड अॅग्रीकल्चरल मशिनरीचा युरोपीय बाजारपेठेत विस्तार

जर्मनीतील व्हील लोडर स्पेशलिस्ट थॅलर जीएमबीएच अँड कंपनी केजीचे केले संपादन



पुणे : भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडची (आयटीएल) बाजारपेठेच्या बदलत्या गरजांवर नेहमीच नजर असते आणि ती भविष्यवेधी तंत्रज्ञानाचे नवे प्रयोग सातत्याने करत असते. आयटीएलची मुख्य कंपनी, युरोपातील नेदरलँड्समधील सोलिस ट्रॅक्टर्स अँड अॅग्रीकल्चरल मशिनरीने जर्मनीतील थॅलर जीएमबीएच अँड कंपनी केजी विकत घेतल्याची नुकतीच घोषणा केली.


ही कंपनी व्हील लोडर उत्पादनातील विशेषज्ञ असून ती जर्मनीतील पोलिंग येथील आहे. आपला सर्वश्रेष्ठ वारसा आणि विस्तार अभियान आर्थिक वर्ष २०२३ मध्ये पुढे नेताना, सोलिसच्या या नव्या संपादनासाठी २०० कोटी रुपयांची गुंतवणूक लागेल. त्यामुळे १९-७५ एचपी रेंजमध्ये उच्च दर्जाच्या व्हील लोडरच्या आयटीएलच्या प्रगत पोर्टफोलियोमध्ये भर पडेल.


व्हील लोडरच्या बाजारपेठेत दरवर्षी ८० हजार युनिटची विक्री होते आणि यात वाढीची अफाट शक्यता आहे. थॅलर जीएमबीएच अँड कंपनी केजी ही युरोपमधील या क्षेत्रातील सुस्थापित कंपनी आहे. या संपादनानंतर थॅलेर ही आपली ओळख न बदलता कार्यरत राहील.या घडामोडीमुळे आयटीएल युरोपमध्ये आपल्या उत्पादन क्षमता आणि जाळ्यात अधिक वाढ करणे शक्य होणार आहे.


त्यामुळे या क्षेत्रातील तिच्या वाढीला अधिक चालना मिळेल. भारतात सोलिसने प्रगत तंत्रज्ञानावर आधारित ट्रॅक्टर विकसित करण्यासाठी कृषी-तंत्रज्ञानाची विशेषज्ञ कंपनी यान्मेरशी सहकार्य केले आहे. वेगाने वाढणाऱ्या डिलरशिपच्या जाळ्यासह सोलिस यान्मेरची भारतात दमदार उपस्थिती असून ती सोलिस वचन हा अनोखा प्रस्ताव देते. यात ५ वर्षांची वॉरंटी आणि ५०० तासांच्या ऑईल चेंज इंटर्व्हलचा समावेश आहे.


या नवीन संपादनाबद्दल बोलताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक मित्तल म्हणाले,भारतातील सर्वात मोठा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड या नात्याने, व्हील लोडर हा आमच्या पोर्टफोलियोसाठी फार मोठा लाभ ठरणार आहे कारण युरोपियन संघ व अमेरिकी बाजारपेठेत शेती, डेअरी आणि बांधकामांमध्ये त्यांची खूप मोठी क्षमता आहे. ही घडामोड आयटीएलच्या सध्याच्या कृषी-उपकरण पोर्टफोलियोला अत्याधुनिक रूप देईल आणि जगातील १४० पेक्षा अधिक देशांमध्ये आमची उपस्थिती बळकट करेल.



थॅलेर जीएमबीएच अँड कंपनी केजीचे मालक श्री. मान्फ्रेड थॅलेर म्हणाले, आयटीएल ग्रुपच्या या संपादनाचा आम्हाला आनंद आणि उत्साह आहे. या संपादनामुळे आयटीएलची तज्ज्ञता व्हील लोडर क्षेत्रातही येईल, असा आम्हाला विश्वास आहे. ट्रॅक्टरच्या क्षेत्रात आयटीएलचा इतिहास आहे आणि त्यांच्याकडे भारतातील सर्वात मोठा ट्रॅक्टर उत्पादक कारखाना आहे. उद्योगाच्या त्यांच्या अनुभवातून थॅलेर ब्रँड आणि येथील कर्मचारी समृद्ध होतील.

Post a Comment

0 Comments