महिंद्रा आणि SBI यांच्यात महाराष्ट्रामध्ये झाला करार

ट्रॅक्टर आणि कृषी संबंधित यंत्रांना वित्तपुरवठा करण्यासाठी घेतला पुढाकार

मुंबई : महिंद्रा समूहाचे एक विभाग आणि संख्येनुसार जगातील सर्वाधिक ट्रॅक्टर उत्पादक महिंद्रा अँड महिंद्रा कृषी औजार विभागाने (फार्म ईक्विपमेंट सेक्टर - FES) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सोबत त्यांच्या ट्रॅक्टर आणि कृषी संबंधित यंत्रांवर संपूर्ण भारतात सुलभ कर्ज पर्याय प्रदान करण्यासाठी करार केला आहे.

महिंद्राच्या ट्रॅक्टर्स आणि कृषी यंत्रांच्या विविध श्रेणींवर वित्तपुरवठा पर्यायांचा  लाभ घेण्यासाठी ग्राहक जवळच्या महिंद्रा ट्रॅक्टर डीलरशिपला भेट देऊ शकतात किंवा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी जवळच्या एसबीआय शाखेला भेट देऊ शकतात. प्रक्रिया सुरू करण्यासाठी ग्राहकांना त्यांची केवायसी कागदपत्रे, उत्पन्नाचा दाखला आणि मालमत्तेची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

या घोषणेबाबत बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा कृषी औजार विभागाने (फार्म ईक्विपमेंट सेक्टर - FES) चे अध्यक्ष श्री. हेमंत सिक्का म्हणाले, “शेतकऱ्यांना त्यांचे कामकाज सुरळीतपणे करता यावे म्हणून योग्य कृषी औजारे निवडण्यास सक्षम करण्यासाठी वित्तपुरवठा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि महिंद्राच्या ट्रॅक्टर्सच्या आणि शेतीच्या यंत्र सामुग्रीच्या विस्तृत श्रेणींसाठी एसबीआय सोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

भारतातील शेतजमि‍नींवर यांत्रिकीकरणाद्वारे शेतीचे रूपांतर करण्याचे आणि शेतकऱ्यांचे जीवन अधिक समृद्ध करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याने एसबीआय सोबतच्या या भागीदारीद्वारे शेतकऱ्यांना त्रासमुक्त, किफायतशीर आणि लवचिक कर्ज सुविधांचा लाभ घेण्यास सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे.”

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या सोबत ट्रॅक्टर आणि शेतीच्या यंत्र सामुग्रीसाठी  वित्तपुरवठा करण्यासाठी भागीदारी करण्याबाबत एसबीआयच्या एग्री बिझनेस यूनिट आणि गवर्नमेंट स्पॉन्सर्ड स्किमचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. शंतनू पेंडसे म्हणाले, “शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यात तंत्रज्ञानाची मोठी भूमिका आहे आणि आम्ही एसबीआय मध्ये देशात उपलब्ध असलेली सर्वोत्तम शेती औजारे आणि यंत्रे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना उत्तमोत्तम आर्थिक उपाय वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

महिंद्रा अँड महिंद्रासोबतची आमची भागीदारी देशभरात टच पॉइंट्सच्या एका व्यापक नेटवर्कद्वारे शेती उपकरणांची विक्री सुनिश्चित करेल आणि आमच्या दर्जेदार वित्तयोजनांच्या श्रेणींद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात सुलभता व सुविधा आणेल.”

एसबीआय भारतातील कृषी वित्तपुरवठयामध्ये एक अग्रणी आणि बाजारातील लीडर असून त्यांचा कृषी अडवांसेस मध्ये पोर्टफोलिओ २,४५,००० कोटींहून जास्त आहे, जो एक कोटीहून अधिक शेतकर्‍यांना समाविष्ट करतो. एसबीआयचे त्यांच्या १५,००० हून जास्त ग्रामीण आणि निम- शहरी शाखांच्या  विस्तीर्ण नेटवर्कच्या माध्यमातून ट्रॅक्टर, कम्बाइन हार्वेस्टर्स, पॉवर टिलर आणि इतर कृषी संबंधित यंत्र सामुग्री  खरेदीसाठी सहज, सुलभ, त्रासमुक्त आणि पुरेसे वित्त प्रदान करते. हा करार शेतकर्‍यांना भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँके मार्फत किफायतशीर वित्त पुरवठ्या द्वारे महिंद्राची आधुनिक आणि नवीनतम उत्पादने घेण्यास सक्षम करतो.

महिंद्रा हा तीन दशकांहून जास्त काळ भारताचा पहिल्या क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रॅंड आहे. १९६३ मध्ये इंटरनॅशनल हार्वेस्टर इन्कॉर्पॉरेटेड, यूएसए सह संयुक्त विद्यमाने त्यांचा पहिला ट्रॅक्टर आणल्यापासून ते आता मार्च २०१९ मध्ये महिंद्रा  देशांतर्गत आणि जागतिक दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना तीन दशलक्ष ट्रॅक्टर्स  विकणारा पहिला भारतीय ट्रॅक्टर ब्रॅंड बनला.

आपल्या बांधणीची अपवादा‍त्मक गुणवत्ता आणि खडबडीत व कठीण भूभागावरदेखील उत्तम कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टरने डेमिंग पुरस्कार आणि जपानी क्वालिटी मेडल्स दोन्ही मिळविले आहेत आणि ही कामगिरी करणारा महिंद्रा एकमेव उत्पादक आहे.

आज महिंद्राकडे सर्वाधिक वैविध्यपूर्ण प्रकारच्या श्रेणींचे ट्रॅक्टर आणि कृषी यंत्र सामुग्री आहे. जी देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी बहूकार्यक्षम वापरासाठी विकसित केली गेली आहे. सहा खंडांमधील ५० पेक्षा जास्त देशांमध्ये याची उपस्थिती असून कंपनीसाठी यूएसए ही भारताबाहेरची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. 

महिंद्राची भारतात सात उत्पादन केंद्रे असून देशभरात १,१०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रांची डीलरशिप आहेत. महिंद्राची त्यांच्या उपकंपन्यांद्वारे जगभरात उत्तर अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, फिनलँड, टर्की आणि जपानमध्ये उत्पादन आणि असेंब्लीसाठी उपस्थिती आहे.

Post a Comment

0 Comments