यावेळी जेएम फायनान्शियल ऍसेट मॅनेजमेंटचे सीईओ अमिताभ मोहंती आणि सीबीओ सीमांत शुक्ला , ह्यूमन रिसोर्स ग्रुप हेड तसेच रियल इस्टेट कन्सल्टिंग बिझनेसचे सीईओ अनिल साळवी याच्यासह कंपनीच्या काही महत्वाच्या भागीदारांचीही उपस्थिती लाभली.
याप्रसंगी बोलताना जेएम फायनान्शियल ऍसेट मॅनेजमेंटचे सीईओ अमिताभ मोहंती म्हणाले, पुणे हे मुंबई खालोखाल महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आहे. आर्थिक आणि औद्योगिक वाढीच्या दृष्टीने ते महत्त्वाचे शहर आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी), इंजीनियरिंग आणि ऑटोमोबाईल कंपन्यांच्या वाढीमुळे अलीकडच्या काही वर्षांमध्ये ते स्टार्टअपचे केंद्र म्हणून पुढे आले आहे. सुदृढ औद्योगिक वातावरण असल्यामुळे पुण्याला सातवी सर्वात मोठी महानगरीय अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळाले असून भारतात सहावे सर्वाधिक दरडोई उत्पन्न येथे आहे.
मोहंती पुढे म्हणाले की , जेएम फायनान्शियल ऍसेट मॅनेजमेंट लिमिटेड सध्या बाजारातील आपली उपस्थिती आणि ग्राहकांची संख्या वाढविण्यावर भर देत आहे. नवीन स्थलांतरित कार्यालय हे पुण्यातील महत्त्वाच्या भागांमध्ये असून आमच्या महत्त्वाच्या भागीदार आणि ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी ते आदर्श स्थान आहे.
पुणे शहरात एचएनआय, किरकोळ आणि कॉर्पोरेट ग्राहक यांचा परिपूर्ण मिलाफ झाला असल्यामुळे ही अत्यंत संतुलित बाजारपेठ आहे. केवळ जेएम फायनान्शियल ऍसेट मॅनेजमेंट लिमिटेडच नव्हे तर संपूर्ण जेएम फायनान्शियल ग्रुपच्या दृष्टीने पुणे हे महत्त्वाचे शहर आहे.
जेएम फायनान्शियल ग्रुप आणि तिच्या सर्व संबंधित कंपन्या पुण्यात लक्षणीय प्रमाणात उपस्थित आहेत आणि ही शाखा त्यात महत्त्वाची भर ठरेल. नवीन रूपातील कार्यालय आणि नव्या दमाच्या विक्रीवर सेवा टीममुळे आमच्या वाढीला संवादाला आणि विस्ताराला चालना मिळेल. आमच्या भागीदारांसाठी पसंतीची निवड ठरणे आणि आमच्या किरकोळ व संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे स्थान बनावे हे आमचे लक्ष्य आहे.
यावेळी जेएम फायनान्शियल ऍसेट मॅनेजमेंटचे चीफ बिझनेस ऑफिसर सीमांत शुक्ला म्हणाले, आमच्या शाखेच्या स्थलांतरामुळे पुण्याची बाजारपेठ आणि आजूबाजूच्या भागांबद्दलची कटीबद्धता वाढली आहे. पुण्यातील एयूएम (ऍसेटस अंडर मॅनेजमेंट) बाजारपेठ जून २०१८ मधील ९७ हजार १७२ कोटी रुपयांवरून जानेवारी २०२३ मध्ये सुमारे १.५४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
म्हणजेच एकूण एयूएममध्ये ६३ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे एयूएमच्या दृष्टीने देशातील अन्य सर्व शहरांच्या तुलनेत पुणे हे चौथ्या क्रमांकाचे शहर बनले. शाखेचे स्थलांतर हे वाढीसाठीच्या धोरणाचा एक भाग असून त्यामुळे अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि सातारा यांसारख्या बाजारपेठेच्या व्यापक भागांवर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल.
0 Comments