न्याती माहेश्वरी फुटबॉल लीग, महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजन
पुणे : तपाडिया थंडर्स संघाने महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी सिक्स-अ-साइड फुटबॉल लीगमधील पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले.
गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल मॉलमधील फुटबॉल ग्राउंडवर ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास डाॅ. नितीन न्याती, विशाल राठी, केतन जाजू, आकाश झंवर, रिषी भूतडा, वेदांत करवा उपस्थित होते. विजेत्यांना आकर्षक ट्राॅफी देण्यात आली.
या स्पर्धेत पुरुष गटाच्या अंतिम लढतीत तपाडिया थंडर्सने पी. पी. रॉयल्स संघाला शूटआउटमध्ये ३-२ ने नमविले. थंडर्स आणि पी. पी. रॉयल्स यांच्यातील लढत निर्धारित ३० मिनिटांच्या खेळात १-१ अशी बरोबरीत राहिली. यात रॉयल्स संघाकडून धीरज मंत्रीने एक गोल केला, तर तपाडिया थंडर्स संघाकडून स्वराज नावनकरने गोल केला.
यानंतर पेनल्टी शूटआउटचा अवलंब करण्यात आला. यात तपाडिया थंडर्स संघाकडून स्वराज नावनकर आणि वरुण पोरवाल यांनी गोल केले, तर रॉयल्सकडून केवळ कौस्तुभ बाहेतीलाच गोल करता आला.
तत्पूर्वी, उपांत्य फेरीत पी. पी. रॉयल्स संघाने व्हाइटफिल्ड वारलॉर्ड्स संघावर १-० ने मात केली. यात कौस्तुभ बाहेतीने केलेला गोल निर्णायक ठरला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत तपाडिया थंडर्स संघाने एमजेएम ग्लॅडिएटर्स संघावर ३-२ ने मात केली.
यात तपाडिया थंडर्स संघाकडून वरुण पोरवालने दोन, तर तेज सरडाने एक गोल केला. ग्लॅडिएटर्स संघाकडून श्लोक झंवरने दोन गोल केले.
0 Comments