![]() |
File Photo |
नवी दिल्ली : सनस्टोन या भारतात १५ पेक्षा जास्त शहरांतील ५० पेक्षा जास्त शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण क्षेत्रातील आघाडीच्या उच्च शिक्षण स्टार्ट अप कंपनीने शालेय विद्यार्थ्यांसाठी नॅशनल स्कॉलरशीप टेस्टचे आयोजन केले होते. १२ वीच्या विद्यार्थ्यांना अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रम निवडण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने पॅन भारतातील २००० पेक्षा जास्त शाळांच्या सहकार्याने ही टेस्ट घेण्यात आली व त्यामध्ये १.५ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते.
भारतातील सर्वात मोठी स्कॉलरशीप टेस्ट समजली गेलेली ही नॅशनल स्कॉलरशीप टेस्ट विद्यार्थ्यांना भारतातील १०० महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी मदत करेल. त्याव्यतिरिक्त सनस्टोनचे लाभ मिळवून देणाऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाख रुपयाची स्कॉलरशीप जिंकण्याचीही संधी मिळेल. या टेस्टमध्ये विद्यार्थ्यांची क्षमता आणि व्हर्बल व क्रिटिकल रिझनिंग यांचे मूल्यमापन करण्यात आले.
याविषयी सनस्टोनचे सह- संस्थापक आणि सीबीओ अंकुर जैन म्हणाले, ‘गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळवून देण्याच्या उद्देशाने आम्ही भारतातील २००० पेक्षा जास्त शाळांच्या सहकार्याने देशातील सर्वात मोठ्या स्कॉलरशीप टेस्टचे आयोजन केले.
आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या करियरमध्ये अडथळे येऊन नयेत म्हणून त्यांना मदत करण्याचा सनस्टोनचा हेतू आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील विद्यार्थ्यांना समान संधी मिळवून देत आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी योग्य अभ्यासक्रम निवडण्यात मदत करण्याचे आमचे ध्येय आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही हजारो विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांची स्कॉलरशीप देऊन आर्थिक सहाय्य करणार आहोत. या विद्यार्थ्यांना मदत करत आम्ही #EducationThatWorks या तत्वाचा प्रसार करण्याचे ठरवले आहे.’
ही टेस्ट १६ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आली होती व त्याचे निकाल १६ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहीर केले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थअयांना अंडरग्रॅज्युएट पातळीवर बीबीए, बीसीए आणि बीटेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यात मदत मिळेल. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या सनस्टोनचा #EducationThatWorks या तत्वावर विश्वास असून उद्योगक्षेत्र व शिक्षणक्षेत्र यांच्यातील दरी सांधण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलेले आहे.
कित्येक शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणे जमत नाही. अशा विद्यार्थ्यांना आपले शिक्षण सुरू राहावे म्हणून आम्ही आर्थिक सहाय्य देत आहोत. या मदतीमुळे त्यांना शिक्षणाचा खर्च भागवणे शक्य होईल, शिवाय सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण उपलब्ध होईल.
नव्या युगातील शिक्षणविषयक स्टार्ट- अप या नात्याने सनस्टोन विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी मदत करत समान संधी देणारा समाज तयार करण्यासाठी बांधील आहे. याच कारणांमुळे सनस्टोन नॅशनल स्कॉलरशीप टेस्ट आणि सनस्टोन राइज प्रोग्रॅम अशा विद्यार्थ्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
0 Comments