जागतिक कर्करोगदिनी `एमक्युअर`तर्फे जनजागृती मोहीमेचे आयोजित

लवकर निदान होणे महत्त्वाचे : कर्मचार्‍यांसाठी कर्करोग जागरूकता



पुणे : अग्रगण्य औषधनिर्माण कंपनी एमक्युअर फार्मास्युटिकल लिमिटेड समाजात आरोग्य आणि स्वास्थ्य वाढवण्यासाठी कटीबद्ध आहे. दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी पाळल्या जाणार्‍या जागतिक कर्करोग दिनानिमित्त कंपनीने कर्करोगाच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी लवकर निदान होण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जागरूकता मोहिमेचे आयोजन केले. हा उपक्रम कर्मचारी कल्याणकारी उपक्रमांशी सुसंगत आहे.


GLOBOCAN च्या मते, भारतात दरवर्षी सुमारे १३ लाख  रुग्णांना कर्करोग निदान होते. यापैकी जवळपास ७०-९०% केसेसचे कारण चुकीची जीवनशैली आणि पर्यावरणीय घटक हे आहे. जोखीम घटकांबद्दल चांगले प्रबोधन आणि जागरूकता कर्करोगाच्या प्रतिबंध आणि लवकर निदान होण्याबाबत लक्षणीय सकारात्मक परिणाम करू शकते. यामुळे, रोगाचा परिणाम आणि रोगावरील उपचार यामध्ये खूप फरक पडतो.


एमक्युअरने नाग फाऊंडेशनच्या सह-संस्थापक आणि भारतातील आघाडीच्या कर्करोगतज्ज्ञ डॉ. शोना नाग यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्वसमावेशक माहिती देणारे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले. सत्रादरम्यान त्यांनी नियंत्रित करण्यायोग्य जोखीम घटक, लवकर निदान होण्याचे महत्त्व आणि काळजी घेण्याबाबत प्रत्येक कर्मचारी कशी भूमिका बजावू शकतो हे देखील सांगितले.


या वर्षीच्या जागतिक कर्करोग दिनाच्या आंतरराष्ट्रीय सूत्राशी हे सुसंगत होते. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांचे सत्र झाले आणि त्यात डॉ. नाग यांनी कर्मचाऱ्यांनी कॅन्सरविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.


कर्करोग जागरूकता वाढविण्यात आघाडीवर असल्याचा कंपनीला अभिमान असून याद्वारे आपण आपल्या कर्मचाऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकण्याची आशा आहे. कर्करोगाबद्दल योग्य माहितीसह सक्षम असलेले एमक्युअर कर्मचारी त्यांचे कुटुंब, मित्र आणि समाज यांच्यासाठी जागरूकता दूत बनतील.


या उपक्रमांमध्ये कर्मचार्‍यांनी घेतलेली प्रतिज्ञा आणि त्यानंतर कॅन्सरमुक्त जगासाठी जागृती निर्माण करण्यासाठी वॉकथॉनचा समावेश होता. एकूणच आरोग्यासाठी शारीरिक हालचालींचे महत्त्व आणि ते कॅन्सरपासून बचाव करण्यास कशी मदत करू शकतात हे यातून दर्शविण्यात आले. गरम हवेचे फुगे आकाशात सोडून आणि त्यानंतर सर्वांसाठी आरोग्यदायी नाश्ता देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.


Post a Comment

0 Comments