16 व 17 फेब्रुवारी रोजी 'सक्षम' सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतर्फे उपक्रम


पुणे :  विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या स्टुडन्ट कौन्सिलतर्फे येत्या १६ आणि १७ फेब्रुवारी २०२३ रोजी 'सक्षम' या वार्षिक आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ह्या बहुप्रतिक्षीत स्पर्धा   युनिव्हर्सिटीच्या परिसरात  होणार असून यात देशभरातून विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. 


सक्षम चे ब्रीदवाक्य हे 'डू व्हॉट इट टेक्स टू बी अँट एसएसपीयु'. किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी  हि महाराष्ट्रातील पहिली कौशल्याधारित युनिव्हर्सिटी असून विद्यार्थ्यंमधील अंगभूत कौशल्ये सुधारण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव  देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते . याचाच एक भाग म्हणून यावर्षीपासून 'सक्षम' चे आयोजन करण्यात येत आहे. 


कला-क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धा असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. सक्षममधील आंतर महाविद्यालयीन क्रीडास्पर्धेत बास्केटबॉल ,फुटबॉल,आणि बॉक्स क्रिकेट चे आयोजन करण्यात येत आहे. एसएसपीयु मध्ये क्रीडाला अनन्य साधारण महत्व असून सदरील सर्व क्रीडा स्पर्धा ह्या युनिव्हर्सिटीच्या प्रशस्त मैदानात भरविल्या जाणार आहेत.


तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्टॅन्ड अप कॉमेडी , समूहनृत्य स्पर्धा, बँड वॉर, संगीतस्पर्धा, गायनस्पर्धा, एकल गायनस्पर्धा,  सौंदर्यस्पर्धा आणि मिस्टर आणि मिसेस सक्षम २०२३ चे  आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धकांना आकर्षित बक्षिसे देण्यात येणार आहेत.


सक्षमच्या माध्यमातून  सिंबायोसिस  स्किल्स युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देत  आहे.  'सक्षम' मध्ये इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिंबायोसिसच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments