शर्विल चौरीडुलेने पटकाविले बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद

१४ वी एकदिवसीय राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धा : विनायक नवयुग मित्र मंडळ

आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजन


पुणे : विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या धनंजय दामले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १४ व्या राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षांखालील गटाचे विजेतेपद शर्विल चौरीडुले याने पटकावले. 


महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेने भांडारकर रस्त्यावरील मिलेनियम टॉवर्स येथे स्पर्धा झाली. शर्विलने सात फेऱ्यांअखेर ६.५ गुण मिळवून १४ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले. 


सातव्या आणि अखेरच्या फेरीत पहिल्या पटावरून पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना शर्विलने स्पर्श बत्राला नमविले. स्पर्श (२१.००) टायब्रेकमध्ये सरस ठरून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ईशान जंडू (१९.२५), दक्ष मार्कन (१९.२५) आणि अनय उपलेंचवार (१८.७५) अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिले. रेवत गायकवाड (५ गुण) सहाव्या, अथर्व काशेळकर (५) सातव्या आणि ध्रुव गांधी (४.५) आठव्या क्रमांकावर राहिला. देवनानी गर्वने (४.५) नववा, तर अर्पित गजभिजे (४.५) दहाव्या क्रमांकावर राहिला.


ओमचा प्रथम क्रमांक

दहा वर्षांखालील गटात ओम रामगुडेने सहा गुणांसह जेतेपद पटकावले. त्याचे आणि कविश लिमये यांचे सात फेऱ्यांअखेर समान सहा गुण झाले होते. टायब्रेकमध्ये सरस ठरल्याने ओमने (२८.५०) अव्वल क्रमांक पटकावला, तर कविश (२४.२५) दुसऱ्या क्रमांकावर राहिला.


विजेत्यांना एकूण ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. त्याचबरोबर करंडक, पदके आणि प्रशस्तीपत्रक देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, आमदार सिद्धार्थ शिरोळे, वुमन ग्रॅंडमास्टर ईशा करवडे, महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रोहन दामले, पुणे जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे सचिव डाॅ. संजय करवडे, इंटरनॅशनल आर्बिटर राजेंद्र शिदोरे, मंडळाचे संस्थापक नंदकिशोर जकातदार, उपाध्यक्ष सुनील पांडे-लोहगावकर, क्रीडा समिती अध्यक्ष भूषण मोरे, सचिव चैतन्य रेड्डी उपस्थित होते.  


१४ वर्षांखालील गट – सातव्या फेरीचे काही निकाल – शर्विल चौरीडुले (६.५) वि. वि. स्पर्श बत्रा (५.५), ध्रुव गांधी (४.५) पराभूत वि. अनय उपलेंचवार (५.५), अर्पित गजभिजे (४.५) पराभूत वि. दक्ष मार्कन (५.५), ईशान जंदू (५.५) वि. वि. ईशान कदम (४.५), अथर्व कशेळकर (५) वि. वि. वरद मोरे (४), आर्यन करमळकर (४) पराभूत वि. रेवत गायकवाड (४), स्वामिराज नवले (४) पराभूत वि. ओवी पावडे (४.५), देवनानी गर्व (४.५) वि. वि. धवल लोंढे (३.५), अर्णव राऊत (३) पराभूत वि. रिषित श्रीवास्तव (४), अदिती कुलकर्णी (३.५) बरोबरी वि. कश्वी राधाकृष्णन (३.५).


अंतिम क्रमवारी – १. शर्विल चौरीडुले (६.५) २. स्पर्श बत्रा (५.५) ३. ईशान जंडू (५.५) ४. दक्ष मार्कन (५.५) ५. अनय उपलेंचवार (५.५) ६. रेवत गायकवाड (५) ७. अथर्व काशेळकर (५) ८. ध्रुव गांधी (४.५) ९. देवनानी गर्व (४.५) १०. अर्पित गजभिजे (४.५).


१० वर्षांखालील गट – सातव्या फेरीचे काही निकाल – मार्मिक शहा (५) पराभूत वि. कविश लिमये (६), शार्वी करपे (४.५) पराभूत वि. ओम रामगुडे (६), अद्विक अगरवाल (५.५) वि. वि. ऋतम मोहगावकर (४), राघव पावडे (४) पराभूत वि. दर्श पोरवाल (५), आरव धायगुडे (५) वि. वि. चिराग रेड्डी (४), गोरांक्ष खंडेलवाल (४) पराभूत वि. चिन्मय रेड्डी (५), सम्यक कुलकर्णी (३.५) पराभूत वि. ईशान अर्जुन पी. वाय. (५), सोहम देशपांडे (३.५) पराभूत वि. हृषीकेश साळी (४.५), प्रीत चरणकर (३) पराभूत वि. श्री भोंग (४.५), सम्यक बेदमुथा (४) वि. वि. युवान कदम (३).

Post a Comment

0 Comments