`द बॉडी शॉप`चा `एंड ऑफ सीझन स्किन-टॅस्टिक सेल` ग्राहकांच्या भेटीला


पुणे :  पर्सनल केअर उत्पादनांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर – बॉडी शॉपचा एंड ऑफ सीझन स्किन-टॅस्टिक सेल पुन्हा एकदा ग्राहकांच्या भेटीला आला आहे! ब्रिटन स्थित आंतरराष्ट्रीय पर्सनल केअर ब्रॅण्डने आपल्या सेलची घोषणा केली असून त्यात यापूर्वी कधीही सेलमध्ये न मांडली गेलेली बेस्टसेलर्स उत्पादने तसेच लग्न आणि वाढदिवसासारख्या खास प्रसंगांसाठीची प्री-पॅक्ड गिफ्ट्सही आकर्षक किंमतीत मिळणार आहेत. १ जानेवारीला सुरू झालेला हा सेल या महिन्याच्या ३१ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. 


या स्किन-टॅस्टिक सेलमध्ये बॉडी शॉपचे मौल्यवान बॉडी बटर कलेक्शन, व्हिटॅमिन-ई श्रेणीतील उत्पादने, हॅण्ड क्लिन्झिंग जेल कलेक्शन आणि वाइल्ड पाइन, स्पाइस्ड ऑरेंज व पॅशनफ्रुट यांसारच्या लिमिटेड एडिशन श्रेणींमधील उत्पादने तब्बल ५० टक्‍के सवलतीच्या दरांत उपलब्ध होणार आहेत. 


इतकेच नाही तर सध्या लग्नसराईची लगबग जोमात सुरू असताना तर बॉडी शॉपचा हा स्किन-टॅस्टिक एंड ऑफ सीझन सेल म्हणजे भेट देण्याचे आदर्श ठिकाण ठरणार आहे. कारण या सेलमध्ये ब्रॅण्डची मेकअप उत्पादने, सेन प्रोटेक्शन आणि फेशियल ऑइल्सही सवलतीच्या दरांत मिळणार आहेत.


त्याचबरोबर देशभरात २००हून अधिक ठिकाणी असणाऱ्या बॉडी शॉप स्टोअर्समधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बाय वन गेट वन ऑफर तसेच त्यांनी निवडलेल्या कोणत्याही चार उत्पादनांवर ३० टक्‍के सवलतही मिळणार आहे. 


या वर्षी, कंपनीने अव्हॅकाडो बॉडी बटर आणि ब्लूम अँड ग्लो ब्रिटिश रोझ अल्टिमेट गिफ्ट यांसारखी उत्पादनेही  निम्म्या किंमतीत उपलब्ध करून देत या खरेदी उत्सवाचा दर्जा थोडा आणखी वाढविला आहे आणि ग्राहकांना त्यांची आवडती पर्सनल केअर उत्पादने स्टॉक करून ठेवत हे संपूर्ण वर्ष ‘स्किन-टॅस्टिक’ करण्याची संधी दिली आहे. 


बॉडी शॉपच्या स्किन-टॅस्टिक सेलमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही आहे! ब्रॅण्डच्या बऱ्याच उत्पादनांना व्हिगन सर्टिफिकेट मिळालेले असल्याने तसेच ही सर्व उत्पादने क्रुएल्टी-फ्री आहेत व रिसायकल करता येण्याजोग्या वेष्टनांतून दिली जात असल्याने उत्पादनांची ही विस्तृत श्रेणी अधिक व्यापक लोकसंख्येच्या गरजा पुरवू शकेल. 


Post a Comment

0 Comments