पुण्यातील नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीस मनाई असल्याने र्व्हच्युअल पद्धतीने जागतिक हास्ययोग दिन साजरा होणार आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्यावतीने रविवार दिनांक ३ मे रोजी सकाळी ११.१५ वाजता फेसबुक आणि यू-ट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जगभर हास्ययोग दिन साजरा होणार आहे. अशी माहिती लाफ्टरयोगा ट्रेनर मकरंद टिल्लू यांनी दिली.
नवचैतन्य हास्ययोग परिवार हा १८० हास्यक्लब शाखा आणि १५ हजाराहून अधिक सदस्यांचा परिवार आहे. संस्थेतर्फे दरवर्षी बालगंधर्व रंगमंदिर येथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो. यावर्षी कोरोनामुळे या कार्यक्रमाचा लाभ सर्वजण घरच्या घरी बसून घेऊ शकणार आहेत. Makarand Tilloo असे लिहून सर्च करा,पानावर क्लिक करुव थोडे खाली स्क्रोल करा. याठिकाणी कार्यक्रम पाहता येणार आहे.
या कार्यक्रमासंदर्भात माहिती देताना मकरंद टिल्लू म्हणाले की, हास्ययोग व हास्यक्लबची संकल्पना रुजविणारे हास्यक्लब संकल्पनेचे जनक, 110 हुन अधिक देशात हास्यक्लब संकल्पना पोहचविणारे आंतराष्ट्रीय कीतीर्चे डॉ. मदन कटारिया यांसह १८० हून अधिक हास्यक्लब निर्माण करून जगात एकाच संस्थेच्या सर्वाधिक शाखा निर्माण करणारे ८२ वर्षाचे तरुण विठ्ठल काटे,लाफ्टरयोग ट्रेनर मकरंद टिल्लू आदी मान्यवर संवाद साधणार आहेत.
सध्याच्या काळात कोरोनामुळे समाज जीवन ढवळून निघाले आहे. लॉक डाऊनच्या काळात मानसिक आजार वाढत आहेत. त्याचा परिणाम शरीरावर होत आहे. हास्ययोग यामुळे शरीर आणि मनाचा व्यायाम होतो. शरीरातील विविध अभिसरण संस्थांना फायदा होतो. कोरोनाचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना आहे.
0 Comments