हाॅस्पीटलच्या मेडिकल टीमच्या प्रयत्नांना घवघवीत यश
या आवाहना प्रतिसाद देत हाॅस्पीटलमध्ये कोविड-19 वाॅर्ड सुरू करण्यात आला. या हाॅस्पीटलमध्ये दाखल पाच रुग्ण महाराष्ट्र दिनाच्या शुभ पर्वावर पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. या सर्व रुग्णांन टाळ्या वाजवून आणि पुष्पवृष्टी करून निरोप देण्यात आला.
पुणे शहरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव आधीच ओळखून सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष तथा श्रीमती काशीबाई नवले मेडिकल काॅलेज आणि हाॅस्पीटलचे संस्थापक प्रा. एम. एन. नवले यांनी हाॅस्पीटल हे कोरोनाच्या रुग्णांसाठी सज्ज करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर युद्धपातळीवर काम करीत येथे कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेष वाॅर्ड तयार करण्यात आला. या ठिकाणी अत्याधुनिक मशीन्स आणि तज्ञ डाॅक्टर्स, नर्सेस व स्टाफ देण्यात आला.
काही दिवसांपूर्वी या हाॅस्पीटलमध्ये 5 रुग्ण दाखल झाले, ज्यांची टेस्ट पाॅझिटिव्ह आली होती. त्यानंतर या रुग्णांवर येथील आरोग्य टीमने अतिशय उत्तम असे इलाज केले. त्याचा परिणाम असा झाला की हे सर्वच्या सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झाले.
येथे दाखल झालेले सर्व रुग्ण हे जुना बाजार, खडकी परिसर भागातली होते. यामध्ये 70 वर्षांपासून ते 17 वर्षांपर्यंत वयोगटातील रुग्ण होते. यातील काही रुग्णांना आधीच ब्लड प्रेशर, डाइबिटीज, हायपरटेंशन यासारखे आजार होते.
तरीदेखील हाॅस्पीटलच्या टीमने दिवसरात्र मेहनत करीत या सर्व रुग्णांना अगदी ठणठणीत बरे केले.
महाराष्ट्र दिनाच्या अत्यंत पावन पर्वावर या सर्व रुग्णांना हाॅस्पीटलच्या टीमने पुष्पवृष्टी करून आणि टाळ्या वाजवून निरोप दिला. सर्व रुग्णांनी येथील डाॅक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, तसेच सर्व अधिका-यांचे आभार प्रकट केले.
या यशाबद्दल श्रीमती काशीबाई नवले मेडिकल काॅलेज आणि हाॅस्पीटलचे डेप्युटी डीन डाॅ. किरण शिंदे यांनी सांगितले की, या हाॅस्पीटलमध्ये अत्यंत उच्च कोटीच्या अशा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तसेच आमच्या मेडिकल टीमने जोरदार प्रयत्न केले, त्यामुळेच हे सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. यानंतरही येथे कोरोनाच्या रुग्णांचा इलाज होत राहील.
या उत्तुंग यशाबद्दल प्रा. एम. एन. नवले यांनी श्रीमती काशीबाई नवले मेडिकल काॅलेज आणि हाॅस्पीटलच्या सर्व अधिकारी, डाॅक्टर्स, नर्सेस, कर्मचारी या सर्वांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी केलेल्या जोरदार प्रयत्नांबद्दल त्यांना प्रोत्साहित करीत भविष्यातदेखील अशीच उच्च कोटीची आरोग्य सुविधा द्यावी, असे निर्देश दिले.
0 Comments