मुंबई, २७ मे २०२० : आयटी आणि फार्मास्युटिकल क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव असल्याने मंगळवारी भारतीय बाजारात घसरण दिसून आली.
व्यापारी सत्राच्या पहिल्या अर्ध्या भागात शेअर बाजाराची कामगिरी चांगली होती. सेन्सेक्स १.३५ टक्क्यांनी वाढून ३१,०८६ अंकांवर पोहोचला होता. त्याचप्रमाणे निफ्टी ५०चा निर्देशांक ९,१६१.६५ अंकांपर्यंत वाढला होता. पण हा सर्व नफा व्यापारी सत्राच्या दुस-या टप्प्यात गमावल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी नमूद केले.
मंगळवारी, बाजार बंद होताना सेन्सेक्स ६३.२९ अंकांनी किंवा ०.२१ टक्क्यांनी घसरून ३०,६०९ अंकांवर होता. तर निफ्टी ९,०२९.०५ अंकांवर थांबला. तो १०.२० अंक किंवा ०.११ टक्क्यांनी घसरला. एनएसईवरील ११ सेक्टरल निर्देशांकांपैकी ८ हिरव्या रंगात दिसून आले. यात निफ्टी मेटल, ऑटो आणि बँकिंग क्षेत्र अनुक्रमे २.७ %, १.५१% आणि ०.९ % वधारले.
आजच्या दिवसातील टॉप लूझर्समध्ये समाविष्ट असलेल्या एअरटेलने सर्वाधिक म्हणजे ५ टक्के मूल्य गमावले. हा शेअर ५५७.९५ रुपयांवर थांबला. इतर लूझर्समध्ये बजाज फिनसर्व (-५.०६%), पिरॅमल एंटरप्रायझेस (-४.९४%), रिलायन्स इन्फ्रा (-४.८२%), इंडियाबुल्स व्हेंचर्स (-४.८१%), रिलायन्स कॅपिटल (-४.५८%) यांचा समावेश आहे. तर टॉप गेनर्समध्ये जेएसपीएल (१२.९९%), गोदरेज इंडस्ट्रीज (१२.४०%), अदानी पॉवर (११.२१%), आदित्य बिरला कॅपिटल (७.३८%) यांचा समावेश आहे.
२ महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारतातील हवाई वाहतूक सुरू झाली असली तरीही हवाई शेअर्सनी आज मंगळवारीही वाईट कामगिरी केली. इंटरग्लोबल एव्हिएशन लिमिटेड हे इंडिगोचे प्रतिनिधीत्व करते. त्याने ३.३१% मूल्य गमावले व ९४२ रुपयांवर स्थिरावले. स्पाइस जेटनेही १.४५% मूल्य गमावले व ४४.३० रुपयांवर स्थिरावले.
जागतिक बाजारपेठ :
आशियाई शेअर्स आज सकारात्मक सुरुवातीला सकारात्मक बाजार करू लागले. जपानच्या निक्केईने १.७ टक्क्यांनी वृद्धी घेतली होती. जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सच्या एमएससीआयच्या व्यापक निर्देशांकानी १.६ टक्क्यांची वाढ घेतली.
एफटीएसईनेही १.११ टक्क्यांची वाढ केली. जगभरात मागणी वाढण्याची आशा असतानाही ओपेकने कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात कपात करण्याचा विश्वास दर्शवल्याने कमोडिटीज मार्केटमध्ये आज तेलाच्या किंमतींनी वाढ दर्शवली.
0 Comments