सूर्या सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये आता कोविड-१९ च्या रुग्णांसाठीचे आयसीयू सज्ज

रोटरी क्लब ऑफ पुणे प्रीस्टीनचा पुढाकार

ICU for Kovid-19 patients is now ready at Surya Sahyadri Hospital

पुणे - 25 मे 2020 रोजी पुण्यातील सूर्या सह्याद्रि हॉस्पिटल येथे रोटरी कोविड -१९ आयसीयू  या नावाने करोनाच्या 10 रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला.

या प्रकल्पाचे उद्घाटन रोटरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर डॉ. भरत पंड्या यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या वेळी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल रवी धोत्रे आणि डीआरएफसी  पूर्वप्रांतपाल डॉ. गिरीश गुणे उपस्थित होते.

हा प्रकल्प रोटरी क्लब ऑफ पुणे प्रीस्टीनच्या पुढाकाराने आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मधील इतर 11 रोटरी क्लबच्या सहकार्याने व रोटरी फाऊंडेशनच्या ग्लोबल ग्रँट माध्यमातून करण्यात आला. सध्याच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून ह्या प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय प्रकल्प सादर केल्यानंतर अवघ्या 24 तासात घेण्यात आला.

या प्रकल्पासाठी सुमारे 72 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. येथे 6 व्हेंटिलेटर (त्यापैकी 2 जीई  कंपनी चे) मॉनिटर, सीरींज पंप, डीफिब्रीलेटर, इत्यादी अतिदक्षता विभागात आवश्यक असलेली यंत्रणा तसेच सुमारे 3 महीने पुरतील इतके पीपीई  किट आणि टेस्टिंग किट आणि सर्व आवश्यक औषधे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

या अतिदक्षता विभागात रुग्णांवर मोफत उपचार केले जातील. या सर्व सोयी सुविधा करोनाचा प्रादुर्भाव संपल्यावर देखील हृदयविकार, कॅन्सरग्रस्त 10 रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग म्हणून उपयोगात आणता येतील.

या प्रकल्पासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे प्रीस्टीन व इतर 11 रोटरी क्लबने मिळून सुमारे 42 लाख रुपये अवघ्या दोन महिन्यांत उभे केले त्याला रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 तर्फे 4 लाख रुपये आणि अमेरिकेतील रोटरी क्लब ऑफ अॅक्टन बॉक्सबरो मॅसेच्युसेट्स तर्फे सुमारे 25 लाख रुपये देऊन मोठी मदत करण्यात आली.

या प्रकल्पासाठी  सर्व सहभागी क्लब ने अत्यंत कमी वेळात हा निधी उभारण्यात मोलाची कामगिरी बजावली.  रोटरी क्लब ऑफ पुणे प्रीस्टीनचे अध्यक्ष नितीन मुळये आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे ग्लोबल ग्रँट संपर्क प्रमुख माजी अध्यक्ष सुदिन आपटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सह्याद्रि  हॉस्पिटल्स चे  अध्यक्ष डॉ. चारुदत्त आपटे म्हणाले की कोविड -१९ ने जगभरातील आरोग्यक्षेत्रासमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे . दिवसागणिक वाढत्या रुग्णसंख्येने संपूर्ण जगभरच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होत असताना स्वयंसेवी संस्था व समाजातील विविध घटकांकडून  होणारी मदत मोलाची आहे.

रोटरी क्लब ऑफ पुणे प्रीस्टीन ने घेतलेला हा पुढाकार स्तुत्य आहे, यामुळे कोविड -१९ ने ग्रस्त असलेल्या व अतिदक्षता विभागात उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना फायदा होईल , त्याच बरोबर ही  महामारी संपल्यावर देखील विविध गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची काळजी घेता येईल.

कोविड -१९ च्या विरोधात सह्याद्रि  हॉस्पिटल्स समूहाने याआधीच अग्रेसर भूमिका घेतली असून डेक्कन , हडपसर व नाशिक येथील आपल्या युनिट्समध्ये समर्पीत बेड्स, कोथरूड येथे लॅब व कराड आणि कोथरूड येथे संपूर्ण समर्पित  इमारतींसह रुग्णसेवा सुरु आहे.

Tags - ICU for Kovid-19 patients is now ready at Surya Sahyadri Hospital

Post a Comment

0 Comments