शेअर बाजारात घसरण; बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्राला बसला फटका

Stock market declines; Banking and FMCG sector hit hard

मुंबई, ६ मे २०२०: शेअर बाजारात सलग दुस-या दिवशी घसरण दिसली. सेन्सेक्सने २६१.८४ अंकांची म्हणजेच ०.८३ टक्क्यांची घट दर्शवली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३१,४५३.५१ अंकांवर होता. तर दुसरीकडे निफ्टीदेखील ८७.९० अंक म्हणजेच ०.९५ टक्क्यांनी घसरला.

शेअर बाजारातील घसरणीचा  सर्वाधिक फटका बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्राला बसल्याचे एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.

शेअर बाजारातील घसरणीमध्ये पीएसयू बँक आणि एसबीआय बँकेचा समावेश आहे. एसबीआयचे समभाग ४.६४ टक्क्यांनी घसरले आणि १७०.५० रुपयांवर बंद झाले. बाजारात घट दर्शवलेल्या इतर बँकांमध्ये बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फिनसर्व्हचा समावेश आहे.

शेअर बाजाराच्या घसरणीसाठी एफएमसीजी क्षेत्रही कारणीभूत ठरले. रॅडिकोखेतान हे सर्वाधिक नुकसानकारक ठरले. या शेअरने ७.३४ टक्क्यांची घट दर्शवली व तो २९३.३५ रुपयांवर बंद झाला. त्यानंतर युनायटेड ब्रेवरीज, गॉडफ्रे फिलिप्स आणि मॅकलिओडरसेल यांचा क्रमांक लागला.

तथापि एफएमसीजीच्या टॉप गेनर्समध्ये नाथबायोजेन्सने ४.९९ टक्क्यांची वाढ दर्शवली. या शेअर्सची सध्याची किंमत २८६.०० रुपये एवढी आहे. नफ्यातील एक स्टॉकमध्ये सनवारीआ कंझ्युमर्स, मेरिको, ईआयडी पॅरी आणि टाटा कॉफी यांचा समावेश आहे.

ऊर्जा आणि इन्फ्रा या दोनच क्षेत्रात भरभराट दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप यादीदेखील दिवसाच्या अखेरीस १ टक्क्यांनी घसरली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सने सलग विक्रीचा तणाव अनुभवला. त्यामुळे निफ्टी मिडकॅप १०० इंडेक्स ०.७ टक्क्यांनी घसरली तर निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स १.३ टक्क्यांनी घसरली. मार्केटमधल्या इतर नफ्यातील स्टॉक्समध्ये भारती एअरटेलचा समावेश आहे. हा शेअर ३.६ टक्क्यांच्या वाढीसह १७०.३५ रुपयांवर बंद झाला.

सरकारी शिथिलीकरणाचा परिणाम: क्रेडिट रेटिंग एजन्सी आयसीआरएने या तिमाहीच्या अखेरीस जून २०२० मध्ये दिलेल्या अहवालानुसार, लॉकडाउनमुळे देशाच्या जीडीपीवर जवळपास २० टक्क्यांनी घसरेल. मात्र सर्व परिस्थिती या वर्षाखेरीस पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

Tags - Stock market declines; Banking and FMCG sector hit hard

Post a Comment

0 Comments