औषधांचे वितरण आणि लॅब टेस्ट सेवा पुरवण्यासाठी मेडलाइफ आणि स्नॅपडील यांच्यात भागिदारी

स्नॅपडीलच्या युजर्सना आता मेडलाइफच्या निदान चाचण्या करता येणार

Partnership between Medlife and Snapdeal to provide drug delivery and lab test services

बेंगळुरू, 6 मे 2020 – भारतातील सर्वात मोठा ई- हेल्थ प्लॅटफॉर्म असलेल्या मेडलाइफने देशातील सर्वाधिक मूल्याचा ई- टेलर असलेल्या स्नॅपडीलशी भागिदारी जाहीर केली असून त्यामुळे स्नॅपडीलच्या प्लॅटफॉर्मवरून औषधे मागवता येतील, तसेच संपूर्ण आरोग्य तपासणी तसेच इतर निदान (डायग्नोस्टिक) चाचण्या करणेही शक्य होईल.

या भागिदारीच्या माध्यमातून आपल्या प्रमुख आणि परवडणाऱ्या दरांतील आरोग्यसेवा देशभरातील लाखो लोकांपर्यंत नेण्याचे मेडलाइफचे उद्दिष्ट आहे.

या भागिदारीमुळे स्नॅपडीलच्या युजर्सना वैध प्रीस्क्रिप्शनसह आता औषधे ऑनलाइन मागवता येणार आहेत. वर्गाला आवश्यक सुरक्षा उपकरणांचा वापर करणारा मेडलाइफचा वितरण कर्मचारी वर्ग ऑर्डर निश्चित झाल्यानंतर 24 तासांच्या आत ग्राहकाच्या घरी औषधे पोहोचवणार आहे.

मेडलाइफने विविध प्रकारच्या चाचण्या उपलब्ध केल्या असून त्यात मधुमेह, थायरॉइड प्रोफायलिंग चाचणी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर जोखीम असलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांनाही सध्याच्या अवघड काळात घरीच आरामात राहून आवश्यक त्या चाचण्या करण्यासाठी मेडलाइफ प्रोत्साहन देत आहे.

त्याशिवाय मेडलाइफच्या सहकार्याने स्नॅपडीलच्या युजर्सना विशिष्ट निकषांअंतर्गत घरीच कोव्हिड- 19 ची तपासणी करण्याचा पर्याय दिला जाणार आहे.

स्नॅपडीलच्या प्लॅटफॉर्मद्वारे विशिष्ट चाचणीची वेळ निश्चित केल्यानंतर मेडलाइफचे प्रशिक्षित आणि प्रमाणित फ्लेबोटॉमिस्ट पूर्वनियोजित वेळेस येऊन नमुना गोळा करतील. नमुना गोळा करण्यासाठी युजर्सना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नसून बहुतेक चाचण्यांचे रिझल्ट्स 48 तासांत दिले जाणार आहेत.

‘स्नॅपडीलवर लॅब चाचण्या व औषधे उपलब्ध झाल्यामुळे सध्याच्या कठीण काळात आमच्या युजर्सचा मोठा फायदा झाला असून त्यांना आपल्या वैद्यकीय गरजा पूर्ण करणे सहज शक्य होणार आहे.

मेडलाइफच्या व्याप्तीच्या मदतीने आम्ही देशभरातील 400 लहान- मोठ्या शहरांत घरातूनच वैद्यकीय चाचणी करण्याचा व युजर्सना घरीच औषधे पुरवण्याचा सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून दिला आहे,’ असे स्नॅपडीलचे प्रवक्ते म्हणाले.

‘स्नॅपडीलबरोबर मेडलाइफने केलेली भागिदारी हा औषधे व डायग्नोस्टिक लॅब चाचण्यांसाठी ग्राहकाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळण्याच्या प्रयत्नांना चालना देण्याचा प्रयत्न असून त्याचबरोबर सुरक्षित अंतर राखण्यासाठीही त्यांना मदत केली जाणार आहे.

लाखो युजर्ससाठी स्नॅपडील हा आदर्श भागीदार आहे, कारण ते कित्येक चिंताग्रस्त, आपली डायग्नोस्टिक चाचणी पुढे ढकलून जोखीम पत्करणाऱ्या रुग्णांसाठी आपला जीव धोक्यात घालून घरीच परवडणाऱ्या दरांत आरोग्यसेवा पुरवणार आहेत.

संपूर्ण जग कोव्हिड- 19 मुळे तयार झालेल्या अनिश्चिततेने ग्रासले असताना आम्ही रुग्णांनी आवश्यक औषधे घ्यावीत आणि घरीच राहून आपल्या चाचण्या पूर्ण कराव्यात याची खात्री करण्याचे ध्येय ठेवले आहे,’ असे मेडलाइफच्या उत्पन्न विभागाचे प्रमुख भावेश सिंघल म्हणाले.

मेडलाइफचे कर्मचारी, फ्लेबोटॉमिस्ट आणि प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ नियमितपणे तापमान तपासण्यासारखी सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेत असून स्वतःच्या तसेच ग्राहक आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुरक्षित उपकरणांचा वापरही ते करत आहेत. या उपायांशिवाय लॅब परिसराची स्वच्छता आणि निर्जंतुकीरणही नियमितपणे केले जात आहे.

Tags - Partnership between Medlife and Snapdeal to provide drug delivery and lab test services

Post a Comment

0 Comments