मुंबई, ६ मे २०२०: अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या आर्थिक शक्तींमध्ये तणावातून युद्ध भडकले असताना सोमवारी स्पॉट गोल्डच्या किंमतीत ०.१४ टक्क्यांनी वाढ झाली.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी चीनने ही महामारी पद्धतशीरपणे रुजवल्याचे पुरावे असल्याचे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यूएस मॅन्युफॅक्चरिंग डेटा ११ वर्षात सर्वात कमी स्तरावर घसरला असून तो अखेरीस ४१.५ वर आला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की लॉकडाउनचे उपाय शिथील झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत असल्याने कोसळणारा तेल व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर येऊ शकेल तसेच जागतिक व्यापार सुधारेल.
मध्य पूर्व, यूएसए आणि जगातील इतर भागांनी अर्थव्यवस्थेला चालना देणा-या उपायांची घोषणा केल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ३.०८ टक्क्यांनी वाढले आणि २०.४ डॉलरवर बंद झाले.
पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेने आणि त्यांच्या समर्थकांनी १ मे २०२० रोजी दररोज उत्पादन कपात करून ९.७ दशलक्ष बॅरल एवढेच उत्पादन करण्यास सहमती दर्शवली. आज क्रूड ऑइलच्या किंमती वाढण्याची अपेक्षा आहे.
चांदीच्या दरात घसरण झाली असून ते ०.६७ टक्के दराने घसरत १४.८ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. एमसीएक्सवर या किंमती ०.७७ टक्क्यांनी घसरून व ४०,९१८ रुपये प्रति किलोवर बंद झाल्या.
0 Comments