मुंबई, १ मे २०२०: जगभरातील विविध सरकारांनी लॉकडाऊन संपुष्टात आणण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केल्यामुळे कमोडिटीबाबत गुंतवणूकदारांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे.
अमेरिका, न्यूझीलंड, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी त्यांची अर्थव्यवस्था सुरळीत करण्याच्या योजनेची घोषणा केली असून यामुळे जागतिक कमोडिटीज मार्केटमध्ये सकारात्मक संकेत दिसत असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
बुधवारी, स्पॉट गोल्डच्या किंमती ०.२२ टक्क्यांनी वाढल्या. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने आज व्याज दर शून्यापर्यंत केले आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा सुधारण्यासाठी सर्व साधनांचा वापर करणार असल्याचे सांगितले.
तथापि अनेक देशांमध्ये कोव्हिड-१९ च्या संभाव्य औषधोपचारांच्या अपेक्षेने लॉकडाउन मागे घेण्याची आशा निर्माण झाली. यामुळे गुंतवणुकदारांनाही जोखीम पत्करण्याची इच्छा होत असल्याने सेफ हेवन अॅसेट गोल्डकडील ओढा कमी झाला आहे.
स्पॉट सिल्व्हरच्या किंमती १.१२ टक्क्यांनी कमी नोंदल्या. त्या १५.४ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. तर एमसीएक्सच्या किंमती १.१५ टक्क्यांनी कमी होऊन ४१,७७५ रुपये प्रति किलोवर बंद झाल्या.
कच्च्या तेलाच्या किंमतीत भरघोस २२ टक्क्यांची वाढ झाली असून ते प्रति बॅरल १५.१ डॉलर या किंमतीवर बंद झाले. चीन आणि जगातील इतर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये मागणीत सुधारणा होत असताना अमेरिकी क्रूड यादीच्या पातळीत अपेक्षेपेक्षा कमी वाढ झाल्याने ही सुधारित स्थिती दिसत आहे.
एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या क्रूड यादीची पातळी ९ दशलक्ष बॅरलने वाढली तर बाजारपेठेत केवळ १०.६ दशलक्ष बॅरलची वाढ अपेक्षित होती.
तथापि, कमकुवत जागतिक मागणी तसेच अमेरिकेची तेलाची साठवण क्षमता वेगाने संपत असल्यामुळे सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींचे चित्र चांगले नव्हते.
0 Comments