आर्थिक प्रोत्साहन पॅकेज नंतरही बाजारात निराशा कायम

 Market disappointment persists even after economic stimulus package

मुंबई, १९ मे २०२० : भारतीय शेअर बाजारात सोमवारीही नकारात्मक वातावरण दिसले. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० ने ३ टक्क्यांची घट दर्शवली. ट्रेडिंग सेशनच्या अखेरीस ३०-शेअर सेन्सेक्स ३००२०.७६ अंकांवर होतो. तो आज १०७६.९७ अंक किंवा ३.४६%नी घसरला. ५०-शेअर निफ्टी याच प्रमाणात म्हणजेच ३१३.६० अंक किंवा ३.४३ टक्क्यांनी घसरून ८८२३.२५ अंकांवर थांबला.

गेल्या आठवड्यात सरकारने अर्थव्यवस्थेसाठी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले आणि तेव्हापासून शेअर बाजाराने लाल रंगच दर्शवला आहे. यातून सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे गुंतवणूकदारांच्या भावना नकारात्मक आहेत असे दिसून येत असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.

शेअर बाजारातील नकारात्मक भावनेमागील आणखी एक कारण म्हणजे सरकारने जारी केलेले देशव्यापी लॉकडाउन. २५ मार्च रोजी लॉकडाउनचा पहिला टप्पा लागू करण्यात आला होता, त्यानंतर आता लॉकडाउनने चौथ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, मारुती आणि बजाज फायनान्स हे प्रमुख लूझर्स ठरले.

प्रत्येक मोसमासाठीचा शानदार स्टॉक आरआयएलने मोठी सुधारणा केली. यातील जनरल अटलांटिक डिलने आज मागील क्लोझिंग ट्रेडच्या तुलनेत जवळपास २ टक्क्यांची वृद्धी घेतली. हा स्टॉक आज रेड झोनमध्ये १,४३८.१५ रुपयांवर बंद झाला. म्हणजेच २१.२५ रुपये किंवा १.४६ टक्क्यांनी घसरण घेतली.

बँकिंग स्टॉक्सला सर्वाधिक फटका:
बहुतांश सेक्टोरल इंडेक्सने दिवसाच्या व्यापारात नुकसान दर्शवले. बँकिंग सेक्टरच्या शेअर्समध्ये झालेली घसरण ही सेन्सेक्सच्या घसरणीत सर्वाधिक वाटेकरी ठरली. पुढील १२ महिन्यांसाठी इनसॉल्व्हेन्सी अँड बँकरप्सी कोड अंतर्गत नव्या इनसाल्व्हन्सी केस नोंद करण्यासाठी सरकारच्या निर्णयानंतर बँकिंग शेअर्सनी आपली अॅसेट क्वालिटीवरून चिंता व्यक्त केली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.

खासगी क्षेत्रातील कर्जदाता एचडीएफसी बँकेच्या मूल्यात ५.५६ टक्क्यांची घसरण दिसून आली. तर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या मूल्यात ७.४२ टक्क्यांची घट दिसली. सर्वाधिक दबाव सहन करणाऱ्या इतर बँकांमध्ये अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचा समावेश असून त्यात ३ ते ७ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

Tags - Market disappointment persists even after economic stimulus package

Post a Comment

0 Comments