कोरोना व्हायरसच्या संकटानंतर शिक्षण पद्धतीत होईल अमूलाग्र बदल

प्रा. डॉ. मंगेश कराड यांचे फेबसबूक लाईव्हद्वारे विद्यार्थ्यांशी साधला संवाद

After the Corona virus crisis, there will be a radical change in the method of education

पुणे - कोरोना व्हायरसच्या गंभीर संकटामुळे भविष्यात जगातिक शिक्षण पद्धतीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विद्यापीठाने व विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलावे लागेल.

बदलत्या तंत्रज्ञाननुसार भविष्यात संशोधन, नवनिर्मिती आणि कलात्मता हे गुण असलेले विद्यार्थ्यी घडविण्याची गरज असून त्याला पूरक ऑनलाईन अभ्यासक्रम तयार करण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे  विद्यार्थ्यांशी व नागरिकांशी संवाद साधताना दिली.

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, भविष्यात तंत्रज्ञान व इतर शाखेच्या शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. तसेच सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठाने संशोधन आणि संशोधक निर्माण करण्याच्या कामावर जोर द्यावा. येणारा काळ आर्थिक मंदीचा असणार आहे. परिणामी, खाजगी आणि सरकारी विद्यापीठांचे अर्थकारण कोसळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करावी लागेल.

कोरोना व्हायरसच्या नंतरची परिस्थिती ही संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक संधी आहे. त्यांना केवळ प्रशिक्षित शिक्षकांच्या शिक्षणाची गरज भासणार आहे. शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण व प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.

काळाची पावले ओळखून एमआयटी एडीटी विदयापीठाने टाटा कन्सलट्न्सीसोबत शिक्षण व्यवस्थापन ही शिक्षण पद्धती सुरू केली आहे. ही पद्धती सर्व खासगी आणि सरकारी विद्यापीठांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. देशात कोरोनासह अनेक समस्या आहेत. त्याच्या निराकरणासाठी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घ्यावे.

कोविडनंतर वैद्यकीय शाखेचा विस्तार होणे गरजेचे असून सरकारने वैद्यकीय शिक्षणाची पाॉलिसी बदलावी.
कोरोना व्हायरसने मानवी जीवनाच्या सर्वच बाजूंवर प्रभाव टाकला आहे. या रोगाला रोखणा-या प्रतिजैविकांचा अद्यापही शोध न लागल्याने हा रोग होऊ नये, यासाठी प्रतिबंधक उपाय योजणे करणे एवढाच उपाय आता सर्वांसमोर उरलेला आहे.

या स्थितीमुळेच लॉकडाउनसारखे धोरण राबवून हा रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या गंभीर परिस्थितीतून निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ऑनलाईन शिक्षणकडे सरकारने अधिक लक्ष द्यावे
कोविडनंतर शिक्षणाच्या पद्धतीत अमूलाग्र बदल येणार आहे. टेक्नॉलॉजी निर्मित कंपन्यांनी काही ऑनलाईन कोर्ससे डिझाईन करावे. स्वयंम सारखे  पोर्टल सुरू करावे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण देशात देण्याची व्यवस्था खासगी विद्यापीठांनी करावी. संशाोधन ही देश विकासाची चावी आहे.
आमच्याकडे हुशार विद्यार्थी संख्या अधिक आहेत. त्यांना आर्थिक पाठिंब्याची गरज आहे. टेक्नॉलॉजी इक्युबेशन सेंटर उभारुन संशोधक विद्यार्थी घडविण्याची गरज आहे.

सोशल डिस्टंन्स ठेवत शिक्षण देण्याची गरज
कोरोना व्हायरसमुळे जगाचे अतोनात नुकसान झाले आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीत होण्याची शक्यता आहे. सोशल डिस्टन्सिंगचे महत्व लक्षात ठेवत विद्यापीठाने ५० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीचे  शिक्षण घरी बसवून तर  ५० टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावून शिक्षण देण्याची गरज आहे.

Tags - After the Corona virus crisis, there will be a radical change in the method of education

Post a Comment

0 Comments