मुंबई, १९ मे २०२० : मागील आठवड्यात ओपेक प्रमुख सौदी अरब आणि त्याच्या सदस्यांनी घोषणा केली की, अति पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी पुरवठा १ मिलियन बॅरल प्रतिदिन एवढा कमी केला जाईल. या एका निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किंमती २४ टक्क्यांपर्यंत वाढल्या.
४.१ मिलियन बॅरलच्या वृद्धीच्या आशेविरुद्ध अमेरिकी क्रूड इन्व्हेंट्रीची पातळी ४,७५,००० बॅरलने कमी झाली. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठया प्रमाणावर वाढ झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
मात्र अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी घोषणा केली की, कोरोना व्हायरसमुळे आलेल्या अडथळ्यांनंतर आर्थिक सुधारणेचा कालावधी अपेक्षेपेक्षा जास्त असू शकतो. त्यातच हवाई आणि रस्ते वाहतुकीवर निर्बंध जारी असेल. त्यामुळे तेलाच्या किंमतीतील वृद्धी काही प्रमाणात मर्यादितच राहिली.
मागील आठवड्यात स्पॉट गोल्डच्या किंमती १.३६ टक्क्यांनी वाढल्या. कारण व्याजदरात घट झाली होती. तसेच अमेरिका आणि चीनदरम्यान नवा तणाव निर्माण झाला. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी प्रयोगशाळांवर दोषारोप करत त्यांना व्हायरस प्रसार आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये मंदीसदृश्य स्थिती निर्माण करण्यासाठी दोषी ठरवले आहे. यामुळे पिवळ्या धातूच्या किंमतीत वेगाने वाढ झाली.
अमेरिकेत धक्कादायक आर्थिक निर्देशांक आणि वाढत्या बेरोजगारीच्या स्तराने सुधारणेच्या प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली आहे. याचा परिणामही बाजाराच्या भावनांवर झाला.
अमेरिकेत मागील आठव़ड्यात स्पॉट सिल्व्हरच्या किंमती ७ टक्क्यांनी वाढून १६.६ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवर किंमती ८.३ टक्क्यांनी वाढून ४,६७१८.० रुपये प्रति किलोवर बंद झाल्या.
0 Comments