मुंबई, ५ मे २०२० : मागचा आठवडा हा जगातील कच्च्या तेलाच्या किंमतींसाठी चांगला होता. डब्ल्यूटीआय क्रूड किंमती १६.८ टक्के एवढ्या आठवड्याभरातील विक्रमी गतीने वाढले. शुक्रवारी ओपेक प्लस संघटनेने नवा पुरवठा करार केला.
द ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलिअम एक्सपोर्टिंग कंट्रीज व त्यातील सदस्य देशांनी १ मे २०२० पासून त्यांचे तेल उत्पादन दररोज ९.७ दशलक्ष बॅरलनी कमी करण्यावर सहमती दर्शविल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
यूएस क्रूड इन्व्हेंटरली लेव्हल्स ९ दशलक्ष बॅरलने वाढल्याचे एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालातून कळाल्यानंतर मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतींना आधार मिळाला. मार्केटला १०.६ दशलक्ष बॅरल वाढीची अपेक्षा होती.
यूएस डिलिव्हरी पॉइंट्सवरील साठवण क्षमता वेगाने संपत असल्यामुळे तसेच जागतिक मागणी कमी झाल्याने याआधीच्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतींवर मोठा परिणाम झाला होता.
गेल्या आठवड्यात, स्पॉट गोल्डच्या किंमती १.६ टक्क्यांनी कमी झाल्या. कारण अनेक देशांमधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाउन शिथिल होण्याची आशा असून गुंतवणुकदारांमधील जोखिमीची भूक वाढली असून सेफ हेवन अॅसेट असलेल्या सोन्याकडे ओढा कमी झाला आहे.
यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर शून्याजवळ ठेवला असून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी संपूर्ण साधनांचा वापर करणार असल्याचे म्हटले. यामुळे सराफा धातूंच्या किंमतींच्या घसरणीवर मर्यादा आली.
गेल्या आठवड्यात स्पॉट सिल्व्हरच्या किंमती १.९७ टक्क्यांची घसरण घेत १४.९ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या होत्या. तर एमसीएक्सने १.९४ टक्क्यांची घट घेत ४१,२३७ रुपये प्रति किलो एवढा दर नोंदवला.
0 Comments