मुंबई, २३ मे २०२०: अनेक अर्थव्यवस्थांनी निर्बंध कमी केल्यामुळे सराफा बाजार आणि धातूंच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. मात्र अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढल्याने गुंतवणूकदारांच्या भावनांवर आणि अर्थव्यवस्था सुधारणेवर परिणाम झाला, अशी माहिती एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी दिली.
माल्या यांनी सांगितले की, गुरुवारी सोन्याच्या किंमती १.३६ अंकांनी घसरल्या आणि १७२५.२ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. पिवळ्या धातूच्या मागणीची कमी होत आहे. मजुरांच्या अनुपस्थितीमुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.
सलग सातव्या आठवड्यात अमेरिकेतील बेरोजगारीचा दर वाढलेला दिसला. अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सोन्याच्या किंमतीत घट झाली. अमेरिका-चीनमधील तणाव आणि कोव्हिड-१९ वरील लसीची चाचणी यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.
स्पॉट सिल्व्हरच्या किंमती २.५ टक्क्यांनी वाढल्या आणि १७.१ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवरील दर ३.५१ टक्क्यांनी घटले आणि ४७,३३५ रुपये प्रति किलोवर बंद झाले.
माल्या म्हणाले की, अनेक अर्थव्यवस्थांमधील लॉकडाउनमध्ये शिथिलता आली असून अग्रेसर तेल उत्पादक देशांनी किंमतीत आक्रमकरित्या घट केली असल्याने कच्च्या तेलाच्या मागणीत वाढ झाली.
परिणामी डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाच्या किंमती १.२८ टक्क्यांनी वाढून ३३.९ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावल्या. तेलाच्या किंमती वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे ओपेक आणि मित्रराष्ट्रांनी केलेली उत्पादन कपात.
बहुतांश अर्थव्यवस्था पुन्हा सुरू झाल्यामुळे कच्च्या तेलाची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र कच्च्या तेलाच्या किंमती मर्यादित प्रमाणातच वाढतील. महामारीमुळे झालेल्या आर्थिक घसरणीमुळे तसेच अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीतील वाढ मर्यादित राहिली.
0 Comments