स्वराज, तृप्ती यांनी पटकावला अव्वल क्रमांक
महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महासचिव सोपान कटके म्हणाले, या स्पर्धेतून राष्ट्रीय वुशू स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील इव्हेन्ट हा खेळाडूने घरातच करायचा होता.
घरातील टेरेस किवा अंगणात कौशल्य सादरीकरण न करता बंद खोलीत कौशल्य सादरीकरण करायचे होते. विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन. या निमित्ताने खेळाडूंनी घरातच सराव करून आपली तंदुरुस्ती कायम राखली. त्याचबरोबर खेळाडूंना खेळातील आपली लयही कायम राखता आली. या स्पर्धेत राज्यातील १५५ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेचे आॅनलाइन उद्घाटन भारतीय वुशू संघटनेचे अध्यक्ष भुपेंद्रसिंग बाजवा यांच्या हस्ते करण्यात आले. या आॅनलाइन सोहळ््याला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव नामदेव शिरगावकर, भारतीय वुशू संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहेल अहमद, अखिल महाराष्ट्र वुशू संघटनेचे अध्यक्ष संभाजी झेंडे, सोपान कटके आदी उपस्थित होते. तर स्पर्धेच्या समारोपप्रसंगी औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, डॉ.सुनील तनेजा उपस्थित होते.
प्रथम क्रमांक विजेत्यास सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र, व्दितीय क्रमांक विजेत्यास रौप्य पदक व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास कांस्य पदक व प्रशस्तीपत्रक तसेच चतुर्थ क्रमांक विजेत्यास कांस्य पदक व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. संदीप शेलार, निलेश वाळींबे, भूषण मराठे, प्रतिक्षा शिंदे पंच म्हणून काम पाहिले.
निकाल - नानकून - वरिष्ठ पुरुष गट - स्वराज कोकाटे (पुणे) - ८.५० गुण, गजानन पवार (पुणे) - ८.२५, निखिल जाधव (पुणे) - ८.००, स्वराज बादस्कर (पुणे) - ७.९०.
वरिष्ठ महिला - तृप्ती चांदवडकर (पुणे) - ८.७५, सलोनी जाधव (पुणे) - ८.७०, श्रेया महाजन (जळगाव) - ७.२५, श्रुष्टी अम्बुरे (परभणी) - ७.१०.
ज्युनियर मुले - करण पवार (औरंगाबाद) - ६.००, आकाश मंडलिक (पुणे) - ५.९५, दीप गोरले (अमरावती) - ५.९०, विकास चव्हाण (औरंगाबाद) - ५.८५.
ज्युनियर मुली - समृद्धी साबळे (मुंबई शहर) - ७.८०.
ज्युनियर मुले (ब गट) - विशाल पासलकर (पुणे) - ८.२५, स्वराज कोकाटे (पुणे) - ८.१०.
ज्युनियर मुली (ब गट) - सलोनी जाधव (पुणे) - ८.२०, अनुराधा अगरवाल (अमरावती) - ६.८५, अपूर्वा धाकुलकर (अमरावती) - ६.७०, चाकशुदा मिश्रा (अमरावती) - ६.५०.
सब-ज्युनियर मुली (ब गट) - सलोनी लोनारे (अमरावती) - ६.५०.
नानदाओ प्रकारात - वरिष्ठ पुरुष - स्वराज कोकाटे (पुणे) - ७.८० गुण, अक्षय पवार (कोल्हापूर) - ६.५०.
वरिष्ठ महिला - तृप्ती चांदवडकर (पुणे) - ८.१५, सलोनी जाधव (पुणे) - ८.०५, श्रेया महाजन (जळगाव) - ७.५०.
ज्युनियर मुली - समृद्धी साबळे (मुंबई शहर) - ७.८५
ज्युनियर मुले (ब गट) - विशाल पासलकर (पुणे) - ८.००, स्वराज कोकाटे (पुणे) - ७.९५.
ज्युनियर मुली (ब गट) - सलोनी जाधव (पुणे) - ८.१०.
0 Comments