नगरसेविका अनिताताई संतोष कदम यांच्याकडून गरजूंना अन्नधान्याचे वितरण


पुणे - आपल्या सामाजिक कार्यासाठी सातत्याने अग्रेसर असलेल्या नगरसेविका तथा पुणे मनपाच्या महिला बालकल्याण समिति सदस्या अनिताताई संतोष कदम यांनी आपल्या प्रभागातील गोरगरीब व गरजू लोकांना अन्नाधान्याच्या कीट वितरित केल्या. ही मदत मिळाल्याने प्रभाग 30 मधील अनेक गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.

कोरोनाची साथ पसरल्यापासून देशभरात लॉक डाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच उद्योग आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत. पर्यायाने  शहरातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.


गरीब नागरिकांची समस्या ओळखून प्रभाग क्रमांक 30 च्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या अनिताताई संतोष कदम यांनी आपल्या प्रभागातील गोरगरीब व गरजू नागरिकांना धान्याच्या कीटचे वितरण केले. यामध्ये 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 2 किलो तूर डाळ, 2 किलो साखर, 2 किलो तेल, चहा पत्ती, असे साहित्य देण्यात आले.


ही मदत मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता, तसेच सर्व लाभार्थ्यांनी नगरसेविका अनिताताई संतोष कदम यांना धन्यवाद दिले. याशिवाय अनितताताई कदम यांच्या वतीने नवश्या मारुती चौक, पानमळा वसाहत, सर्वे नंबर 132 दांडेकर पूल गणेश मंडळ तथा जनता वसाहतीमध्ये हात निर्जुंतुक करणारे यंत्र बसवण्यात आले आहे.

आपल्या उपक्रमासंदर्भात बोलताना अनिताताई म्हणाल्या की, सध्या कोरोनाची साथ पसरलेली असताना शहरातील अनेक गरीब आणि गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवत आहे. त्यातच अनेकांचा रोजगारदेखील हिरावला गेला आहे, त्यामुळे त्यांच्या या समस्यांमध्ये अधिकच भर पडली आहे. लोकांची ही अडचण समजून सामाजिक बांधिलकी जपत आम्ही फूड पॅकेटचे वितरण केलेले आहे.

Tags - Distribution of foodgrains by corporator Anitatai Santosh Kadam

Post a Comment

0 Comments