पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सॅनिटायझेशन चेंबरची उभारणी

बांधकाम व्यवसायिक विशाल गोखले यांचा पुढाकार 

sanitation chamber at various police stations has built in Pune city

पुणे - कोरोना विषाणूशी दोन हात करताना अत्यंत गरजेच्या अशा लॉकडाऊन प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आपली पोलीस यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहे. पोलीस दलातील कर्मचा-यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांधकाम व्यवसायिक विशाल गोखले यांनी पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सॅनिटायझेशन चेंबर अर्थात निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी केली आहे.

पौड रस्त्यावरील कोथरूड पोलीस स्टेशनमधील सॅनिटायझेशन चेंबर महापौर मुरलीधर मोहोळ व पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आले. कोथरुड पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी व बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले हे देखील या वेळी उपस्थित होते.

sanitation chamber at various police stations has built in Pune city

गोखले यांच्या वतीने राबविण्यात येणा-या या उपक्रमात पहिल्या टप्प्यात शिवाजीनगर, प्रभात रस्ता, डेक्कन जिमखाना, पौड रस्ता, कोथरूड, अलंकार पोलीस चौकी व वारजे येथील पोलीस ठाण्यांबाहेर सॅनिटायझेशन चेंबर उभारण्यात आले आहेत.

स्वत:चा जीव धोक्यात घालून चोख कर्तव्य बजाविणा-या पोलिसांसाठी काहीतरी करता आले याचा आनंद आहे, असे विशाल गोखले यांनी सांगितले. येत्या काही दिवसांमध्ये अंदाजे २० पोलीस ठाणे/ पोलीस चौक्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

फोटो ओळ- पौड रस्त्यावरील कोथरूड पोलीस स्टेशनमधील सॅनिटायझेशन चेंबर आजपासून कार्यान्वित करण्यात आले. यावेळी फोटोत डावीकडून प्रतिभा जोशी, पौर्णिमा गायकवाड, मुरलीधर मोहोळ आणि विशाल गोखले.

Tags - sanitation chamber at various police stations has built in Pune city

Post a Comment

0 Comments