दर्जेदार शिक्षणाकरिता एडटेक मंच 'यपमास्टर' झाला लॉन्च

 'Yapmaster' launches grade teaching educator platform

मुंबई - डिजिटल शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणा-या YP-TV ने देशात दर्जेदार शिक्षणाच्या लोकशाहीकरणासाठी 'यपमास्टर' हा नवा एडटेक मंच लाँच केला आहे. या मंचावर दर्जेदार तंत्रज्ञान सुविधा, विविध विषयांचे तज्ञ शिक्षक, लाइव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस उपलब्ध आहेत, तसेच सध्या देशातील आआयटी-जेईई आणि एनआयआयटी इच्छुकांसाठी हा सर्वात किफायतशीर प्लॅटफॉर्म आहे. विशेष म्हणजे मध्य पूर्वेतही या मंचाची सुविधा उपलब्ध आहे.

यपमास्टरवर ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना आयआयटी जेईई आणि एनआयआयटी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्सदेखील उपलब्ध आहेत. कोव्हीड-१९ च्या लॉकडाउनमुळे या एडटेक प्लॅटफॉर्मवर सध्या १२वीतील जे विद्यार्थी आयआयटी-जेईई/एनआयआयटीसाठी इच्छुक आहेत, त्यांना मोफत शिकवण्या सुरू आहेत.

यपमास्टरच्या वैयक्तिक कोर्सेसमध्ये ३ ते ६ तास दररोज लाइव्ह क्लास असून त्याच वेळेला लाइव्ह चॅटद्वारे विद्यार्थी त्यांच्या मनातील शंका विचारू शकतात. लाइव्ह क्लासेस हे कधीही, कुठेही आणि कोणत्याही उपकरणावर उदा. वेब, मोबाइल, टॅबलेट किंवा स्मार्ट टीव्हीवर पाहता येतात.

तसेच यावर निवडक स्टडी मटेरिअल, कॉम्प्रहेन्सिव्ह टेस्ट, ग्रेडिंग मोड्यूल्स असून हे मंचावरील शीर्ष शिक्षकांकडून तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण पद्धतशीर व्हावे, यासाठी २४ तास शंका निरसनाची सुविधा असेल.

यपमास्टरचे संस्थापक व सीईओ उदय रेड्डी म्हणाले, 'यपमास्टरच्या माध्यमातून भारतातील शहरी, निमशहरी, ग्रामीण अशा प्रकारच्या सर्वच भागातील विद्यार्थ्यांना किफायतशीर दरात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वोत्कृष्ट शिक्षक,

जागतिक दर्जाची स्ट्रीमिंग टेक्नोलॉजी आणि शिक्षण व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांसाठी अधिक तयार होतील, अशी आम्हाला खात्री आहे.'

Tags - 'Yapmaster' launches grade teaching educator platform

Post a Comment

0 Comments