कोरोना महामारीला होमीओपॅथीने अटकाव!

कोरोना महामारीला होमीओपॅथीने अटकाव !

कोरोना, आज हा अत्यंत जीव घेणाऱ्या विषाणू पैकी एक आहे. कोरोना कसा सुरु झाला किती पटकन तो जागतिक पातळीवर पोहचला हे सर्वांना माहित आहे. आज त्याकडे प्रत्येक देश विश्वरूपी संकट म्हणून पाहत असून योग्यरित्या हाताळण्याचा प्रयत्न करत आहे.

काही महत्वाचे प्रश्न, हे विषाणू जीव घेणे ठरू शकतात का? जिवाणू आणि विषाणूमध्ये काय फरक आहे?  विषाणूचे गुणधर्म काय असतात आणि का एवढी काळजी घेणे आवश्यक आहे? भारतासारख्या देशात लॉकडाउन असून सुद्धा रुग्णांची संख्या का वाढत आहे? हा सर्व प्रकार कधी आणि कसा थांबू शकेल? सर्व जग सुरळीत आणि निर्धास्तपणे कधी सुरु होईल? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसले असतील.


सर्वात महत्वाचे जिवाणू आणि विषाणू हे दोन्ही ही घातक ठरतात परंतु जिवाणूसाठी अँटी बॅक्टरीअल उपचार उपलब्ध असल्याने रुग्ण हा औषधे घेऊन बरा होऊ शकतो, विषाणूंसाठी मॉडर्न मेडिसिनमध्ये औषधाना बंधने येतात त्यामुळे अँटी वायरल उपचार कमी प्रमाणात यशस्वी ठरतात याचे कारण विषाणू हे जिवाणूंपेक्षा आकाराने अतिसूक्ष्म असतात, ते सामान्य सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाहीत. विषाणू हा पेशींच्या खोलवर शिरतो त्यामुळे पेशींच्या सूक्ष्म जागी कोणतेही मॉडर्न मेडिसिन जाणे अशक्य असते.

समजा विषाणूंना मारण्यासाठीची औषधे पेशींच्या खोलवर शिरली तर ती औषधे पेशींना सर्वात आधी मारतील. त्यामुळे कोणतेही मॉडर्न मेडिसिन विषाणूंना मारू शकत नाही. अशा वेळी विषाणूंना निशाण्यावर न घेता पेशींची शक्ती म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधोपचाराचा अवलंब करणे अधिक हितकारी ठरेल, अशी माहिती  पुणे येथील ज्येष्ठ हृदयरोग होमिओपॅथिक तज्ञ डॉ.विद्यासागर उमाळकर यांनी दिली.

डॉक्टर उमाळकर पुढे म्हणतात कि, होमीओपॅथिक औषधोपचार रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करत असते . होमीओपॅथिचा इतिहास लक्षात घेता ह्या शास्त्राच्या सिद्धांताचा उल्लेख पाच हजार वर्षांपूर्वी भागवत पुराणात व्यासांनी केला होता; ''आमयो यसच भुतानां जयते येन सुव्रता|  तदेव याम्यहं द्रव्यं न पुनती चिकितसितम ||' ''similia similibus curantur .  जरी ही औषध पद्धती जर्मनी मधील डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांनी विकसित केली असली तरी याचा मूळ सिद्धांत हा भारतीयच आहे.

होमीओपॅथि ही एकमेव अशी चिकित्सा पद्धती आहे ज्या मध्ये औषधीय गुणधर्म असणारे कण हे पेशींच्या खोलवर म्हणजेच DNA आणि RNA पर्यंत पोहचतात व पेशींना विषाणूंशी लढण्यास मजबूत करतात. थोडक्यात होमीओपॅथी सूक्ष्मांतीसूक्ष्म ( nano to nano ) सिद्धांतावर म्हणजेच quantum theory  वर काम करते.


Post a Comment

0 Comments