मधुमेह व उच्च रक्तदाबाने ग्रस्त ५६ वर्षीय महिला दोन आठवड्यातच पूर्णपणे बरी
पुणे - रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल झालेल्या पहिल्या कोविड- १९ रुग्णाला शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. ५ एप्रिल दरम्यान या ५६ वर्षीय महिलेला ताप, खोकला आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला होता. काही काळाने त्यांना अशक्त वाटू लागले व लक्षणे अधिक तीव्र होत गेली.
त्यानंतर त्यांना रुबी हॉल क्लिनिक मध्ये ८ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले, त्यांची नॉवेल करोना संदर्भातील चाचणी पॉजिटीव्ह आली. दोन आठवडे मिळालेल्या आरोग्यसेवेनंतर आता ही महिला बरी झाली असून आपल्या घरी गेली आहे.
रुबी हॉल क्लिनिक मधील न्यूरो ट्रॉमा युनिटचे संचालक व प्रमुख डॉ. कपिल झिरपे म्हणाले की, जेव्हा त्या हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्या तेव्हा त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण व रक्तदाब नियंत्रणाबाहेर चालले होते . त्यांच्या या गंभीर होत चाललेल्या स्थितीकडे पाहता त्यांना आर्टिफिशिअल व्हेंटिलेशन लागू शकते. असे आम्हाला वाटले. स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून त्यांना लगेचच ऑक्सिजन चा पुरवठा मोठ्या प्रमाणावर करण्यात आला.
त्यांच्यावर केलेल्या उपचारांबाबत बोलताना हॉस्पिटल मधील अधिकाऱ्यांनी सांगितले की या महिलेवर उपचार करताना इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले.
याचे कारण ह्या रुग्ण कोविड पॉजिटीव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या होत्या. हॉस्पिटमध्ये विलगीकरणाच्या कामकाजाची जवाबदारी पेलणाऱ्या डॉ सुशील यादव आणि त्यांचा टीमने लगेचच पुढील उपचारासाठी या रुग्णाचे विलगीकरण केले.
त्यांची चाचणी पॉजिटीव्ह आल्यावर आमच्या मनातील शंका खरी ठरली . ही परिस्थिती आव्हानात्मक होती कारण त्यांना इतर दीर्घकालीन आजार होते , असे मत रुबी हॉल क्लिनिक चे वैद्यकीय संचालक डॉ संजय पाठारे यांनी व्यक्त केले .
निदान चाचणीतून हे लक्षात आले की रुग्णाला न्यूमोनिया झाला होता . आमचे प्राधान्य हे त्यांची रक्तातील साखर आणि ऑक्सिजन चा पुरवठा नियंत्रित ठेवणे हे होते . पुढील पाच दिवसात त्यांची ऑक्सिजन ची गरज कमी झाली आणि त्याप्रमाने पुरवठा कमी केला गेला.
त्यांचा परिस्थितीवर कटाक्षाने देखरेख करण्यात आली आणि त्यांच्या मध्ये सुधारणा दिसू लागली, तसेच व्हेंटिलेटरची गरज राहिली नाही . त्यानंतर त्यांच्यात सतत सुधारणा होत गेली आणि आता त्या सुखरूप आपल्या घरी गेल्या आहेत, अशी महिती डॉ. कपिल झिरपे यांनी दिली .
रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले की, रुबी हॉल क्लिनिकमध्ये आजवर दाखल झालेल्या या एकमेव कोविड पॉजिटीव्ह रुग्ण होत्या आणि त्या ठणठणीत ब-या होऊन घरी जाणे ही अत्यंत आनंदाची बातमी आहे .
या महामारीच्याच्या काळात डॉक्टर्स , कर्मचारी व रुबी हॉल क्लिनिक मधील प्रत्येक सदस्य अतिरिक्त प्रयत्न करून रुग्णांची काळजी घेत आहेत . मला खात्री आहे आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी आपण या महामारीवर मात करू शकू.
0 Comments