पुणे - जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी व केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेण्याच्या अनुषंगाने केंद्रीय पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, शुक्रवारी त्यांनी व्हिडिओ काॕन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींशी संवाद साधला व त्यांची मते जाणून घेतली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या व्हि.सी.रूममध्ये हा संवाद कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय पथक प्रमुख तथा भारत सरकारच्या ऊर्जा विभागाचे अपर सचिव संजय मल्होत्रा, डाॕ. पी. के. सेन, डाॕ.पवनकुमार सिंग, डाॕ.अरविंद अलोने, करमवीर सिंग, विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते.
केंद्रीय पथक ठिकठिकाणी दौरा करून परिस्थितीची माहिती घेत आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न करण्याची गरज आहे. मुंबई नंतर पुण्याची परिस्थिती गंभीर असल्याने वेळीच अटकाव करण्याची आवश्यकता आहे. हे पथक ठिकठिकाणी जाऊन उपयुक्त अशा सूचना करतात.
आज त्यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. खा.अमोल कोल्हे, आ.चंद्रकांत पाटील व अन्य जवळपास 28 लोकप्रतिनिधींशी आज त्यांनी व्हिडिओ काॕन्फरन्सिंगवर संवाद साधून चर्चा केली. त्या-त्या भागातील परिस्थितीची माहिती समजून घेतली.लोकप्रतिनिंधींनी केलेल्या सूचना शासनाला कळविण्यात येईल,असे केंद्रीय पथकाने यावेळी सांगितले.
0 Comments