एस. यू. एच. आर. सी. तर्फे ५०० विलगीकरण आणि ३० अतिदक्षता बेड्स उपलब्ध
पुणे - सध्या जगभर कोविड-19 च्या विषाणूने थैमान घातले असून, आतापर्यंत 80 हजारांहून अधिक लोकांचा जगभरात बळी गेला आहे. भारतात आणि विशेषतः पुण्यात याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत या स्थितीत कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हाॅस्पीटलनेही आता पुढाकार घेतला असून, यासंदर्भात पुणे महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारावर नुकत्याच स्वाक्ष-या करण्यात आल्या.
या उपक्रमाअंतर्गत सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हाॅस्पीटलमध्ये एक नोडल सेंटर स्थापन करण्यात आले असून, हे सेंटर पुणे महानगरपालिकेच्या सहयोगाने चालविले जाणार आहे. या ठिकाणी कोविड-19 च्या संसर्गित रुग्णांवर इलाज करण्यासाठी 500 विलगीकरण आणि 30 अतिदक्षता बेड स्थापित करण्यात आले आहेत. शिवाय सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवा या ठिकाणी उपलब्ध असतील.
हा सामंजस्य करार करते वेळी सिंबायोसिस हॉस्पिटलचे सीईओ डॉ. विजय नटराजन, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सिम्बायोसीस तथा मनपा आणि जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी उपस्थित होते.
वुहान येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा होण्यापूर्वीच " सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर" (एसयूएचआरसी) तर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात आलेली आहे.
एसयूएचआरसीने रुग्णालय कॉम्प्लेक्समध्ये एक स्वतंत्र कक्ष "खोकला, ताप आणि श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी तयार केला आहे हा कक्ष उर्वरित ओपीडी क्षेत्रापासून विभक्त ठेवलेला आहे जेणेकरून संक्रमणाचा धोका टाळता येईल. .छाती आणि अंतर्गत औषधांमधील तज्ज्ञ डॉक्टर्स अश्या रुग्णांची दररोज तपासणी करीत आहेत.
एसयूएचआरसी मध्ये ३० पूर्णपणे सुसज्ज अश्या खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत जेणेकरुन डॉक्टरांकडून तपासणी करून झाल्यावर रुग्णाला त्वरित तेथे दाखल करता येईल व विषाणूचा प्रसार रोखता येईल. विलगीकरण कक्षामध्ये प्रत्येक खाटांमध्ये ६ फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त, रुग्णालयाच्या जवळच्या इमारतीत देखील विलगीकरण कक्षाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. येथे ७व्या आणि ८ व्या मजल्यावर प्रत्येकी ११ खोल्या सर्व सोयीनी सुसज्ज करण्यात आल्या आहेत.
एक सुसज्ज रूग्णालय म्हणून एसयूएचआरसी मध्ये ८०० पेक्षा जास्त खाटांची सुविधा उपलब्ध आहे तसेच ५०० पेक्षा अधिक राखीव खाटांची सुविधा कोविड १९ च्या रूग्णांसाठी करण्यात आलेली आहे. याशिवाय स्वतंत्र ३० खाटांच्या आयसीयूची तरतूद देखील करण्यात आलेली आहे.
कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांना याटिकाणी सरकारी दरात उपचार दिले जाणार आहेत. रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सेवा देखील उपलब्ध आहे जेणेकरून रुग्णांना गर्दी असलेल्या सरकारी सुविधांमधून स्थानांतरित करणे शक्य होईल, अशी माहिती सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हाॅस्पीटलच्या वतीने देण्यात आली आहे.
0 Comments