मुंबई - कोविड-१९ मुळे भारतातील शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर लीड स्कूल देशभरातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना लीड स्कूल@होम सुविधा देत आहे, ज्यामुळे या शाळांना त्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरु करण्यात मदत मिळणार आहे. लीडच्या सध्याच्या सहयोगी शाळांमधील एक लाखांहून जास्त विद्यार्थी २ एप्रिलपासून त्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करणार आहेत.
लीड स्कूल@होम मुळे विद्यार्थ्यांना घरी सुरक्षित राहून आपल्या पालकांच्या फोन किंवा कम्प्युटरवर शाळेच्या वर्गांमध्ये सहभागी होता येणार आहे. इयत्ता पहिली ते नववीचे विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. इतकेच नव्हे तर, पूर्व-प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे पालक देखील आपल्या मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी, त्यासोबत त्यांचा अभ्यासही व्हावा यासाठी लीड स्कूल@होमचा वापर करू शकतात.
लीड स्कूलचे सह-संस्थापक व सीईओ श्री. सुमीत मेहता यांनी सांगितले, "भरपूर मोठी सुट्टी आणि त्याचा मुलांच्या अभ्यासावर होत असलेला परिणाम यामुळे शाळा आणि पालक चिंताग्रस्त आहेत. आमच्या शिक्षण प्रणालीमुळे आणि तंत्रज्ञानाने आता अशी सुविधा उपलब्ध झाली आहे की जर मुले शाळेत येऊ शकत नसतील तर आपण शाळा मुलांच्या घरी नेऊ शकतो.
आता कोणतीही शाळा लीड स्कूल@होम सोबत आपले शैक्षणिक वर्ष सुरु करू शकते. यासाठी त्यांना फक्त लीड स्कूल पोर्टलवर नोंदणी करायची आहे. आमची टीम त्यांना पुढील कार्यवाही तातडीने होण्यासाठी मदत करेल. २ एप्रिल, ६ एप्रिल किंवा १३ एप्रिल या तीनपैकी कोणत्याही एका तारखेला शाळांना आपले शैक्षणिक वर्ष सुरु करता येईल.
पालक आणि विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अतिशय सहजसोपी आहे कारण त्यांना फक्त लीड पॅरेन्ट ऍप डाउनलोड केल्यावर त्यांचे सर्व क्लासेस, गृहपाठ आणि असेसमेंट्स मिळतील. या सुविधेमुळे मुले घर बसल्या शाळेच्या वर्गांत शिकवल्या जात असलेल्या अभ्यासाचा लाभ घेऊ शकतील."
लीड स्कूलने आपली लीड स्कूल@होम सुविधा आपल्या सर्व ८०० सहयोगी शाळांसाठी मार्च महिन्याच्या मध्यापासूनच सुरु केली होती. कोविड-१९ संकट सुरु झाल्यामुळे देशभरातील राज्य सरकारांच्या घोषणेनुसार शाळा बंद ठेवण्यात आल्यानंतर देखील लीड स्कूल@होम सुविधेमुळे विद्यार्थ्यांना त्यांचा मागील शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात मदत मिळाली. आता या सहयोगी शाळांबरोबरीनेच इतर शाळा देखील आपले नवीन शैक्षणिक वर्ष लीड स्कूल@होम मार्फत सुरु करत आहेत.
नवीन शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने सुरु करणे हे पालक आणि शिक्षक या दोघांसाठी देखील सुरुवातीला एक आव्हानच असेल परंतु ही प्रक्रिया जास्तीत जास्त सुरळीतपणे, सहजसोप्या पद्धतीने चालावी यासाठी लीड स्कूल सर्वतोपरी प्रयत्न करेल. शाळेने या प्रोग्रॅमसाठी साईन-अप केल्यानंतर त्यांचे विद्यार्थी दोन दिवसात या लाईव्ह ऑनलाईन वर्गांमध्ये सहभागी होणे सुरु करू शकतील.
याखेरीज लीड स्कूल@होम मध्ये नोंदणी करणाऱ्या शाळांना वेळापत्रक, डिजिटल कन्टेन्ट आणि डिजिटल वर्कबूक्स हे सर्व देखील सहज उपलब्ध होईल. लाईव्ह वर्गांवर आणि ऑन-डिमांड कन्टेन्टवर देखील त्यांना लक्ष ठेवता येईल. लीड स्कूल पॅरेन्ट ऍपमार्फत विद्यार्थ्यांना गृहपाठ व असेसमेंट्स मिळतील. हे ऍप पालकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती देत राहील.
लाईव्ह वर्ग, गृहपाठ आणि असेसमेंट्स याबाबत अधिक माहितीसाठी कृपया येथे लॉग ऑन करा - http://bit.ly/LEADappforparent लीड स्कूल@होम प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक शाळांनी कृपया या क्रमांकावर संपर्क साधावा - 8682833333
काय आहे लीड स्कूल?
लीडरशिप बॉलवर्ड ही भारतातील सर्वाधिक वेगाने प्रगती करत असलेल्या शिक्षण कंपन्यांपैकी एक कंपनी लीड स्कूलची प्रायोजक आहे. लीड स्कूलची स्थापन २०१२ मध्ये करण्यात आली. ही शाळांसाठी तयार करण्यात आलेली एकात्मिक शिक्षण प्रणाली आहे जी विद्यार्थ्यांना उच्चतम स्तरावर शिक्षण घेण्यात मदत करते. लीड स्कूलमध्ये तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र यांचा मिलाप घडवून आणून शिकवण्याची आणि शिकण्याची एक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे, जेणेकरून देशभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अभ्यासातील आणि शिक्षकांची शिकवण्यातील कामगिरी सुधारता येईल. लीड स्कूलच्या मालकीच्या सहा शाळा असून देशभरातील १५ राज्यांमधील द्वितीय ते चतुर्थ श्रेणीच्या शहरांसह ३०० पेक्षा जास्त शहरांमधील ८०० पेक्षा जास्त शाळा लीड स्कूलच्या सहयोगी आहेत. या शाळांमध्ये मिळून जवळपास ३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

0 Comments