केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांसाठी 'लर्न फ्रॉम होम' उपक्रम

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढाकार ः हर्षदा जाधव

 'Learn from home' program for students at KJ Educational Institute

पुणे - कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. सर्वच शाळा-महाविद्यालयांना सुटी घोषित करण्यात आली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या वतीने 'लर्न फ्रॉम होम' संकल्पनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे.

यासाठी विविध सोशल साईट्स, आधुनिक लर्निंग अप्लिकेशन्स आणि मोबाईलच्या योग्य वापरातून नावीन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत आहे. या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मदद मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या अभिनव उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव यांच्यासह खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, विभावरी जाधव, संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, संकुल संचालक डॉ. व्यासराज काखंडकी यांच्या प्रेरणेतून आणि प्राचार्य डॉ. निलेश उके, डॉ. सुहास खोत, डॉ. बी. एम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पद्धत उपयोगात आणली जात आहे.

 'Learn from home' program for students at KJ Educational Institute

या उपक्रमाससंदर्भात 'केजेईआय'च्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव म्हणाल्या की, संस्थेच्या सर्वच महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना या कठीण काळातही मौलिक मार्गदर्शन करीत आहे. कोरोनामुळे विद्यार्थी व प्राध्यापक आपापल्या गावी किंवा घरी आहेत. अशा स्थितीत  त्यांच्यातील अंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने दूर करून शैक्षणिक उपक्रम राबवला जात आहे.

एसएमएस, फोन कॉल, फेसबुक, व्हॉट्सअप यासह वेबिनार, मूडल आदी अॅप्लिकेशन्सचा वापर करून प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या भविताव्याला उज्ज्वल बनवण्यासाठी प्राध्यापकांची ही कृती कौतुकास्पद आहे."

ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधील विभागप्रमुख प्रा. दीप्ती कुलकर्णी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना रोज विविध विषयांच्या नोट्स, प्रात्यक्षिके, असाईनमेंट दिल्या जात आहेत. त्यांचे मूल्यमापन आणि त्यांना येणाऱ्या शंकांचे निरसन वैयक्तिक पातळीवर केले जात आहे.

आठवड्याचे सबमिशन आणि त्याचा आॅनलाईन पाठपुरावा केला जातो. सर्व प्राध्यापकांच्या, विभागप्रमुखांच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतल्या जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात अभियांत्रिकी शिक्षणात सातत्य राहण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल.

सध्याच्या काळात प्राध्यापकदेखील घरी बसून आपले शोधप्रबंध पूर्ण करीत असून, वेळोवेळी ज्ञान अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे डॉ. नीलेश उके यांनी नमूद केले.

Tags - 'Learn from home' program for students at KJ Educational Institute

Post a Comment

0 Comments