मुंबई - पाश्चिमात्य देशांच्या बाजारपेठेशी तीव्र विरोधाभास दर्शवत भारतीय फ्लॅगशिप निर्देशांक सलग तिस-या दिवशी प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून आले. ग्रीन झोनमधील लॉकडाउन उघडण्याच्या आशेमुळे मेटल निर्देशांकांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाल्याचे एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.
निफ्टी मेटलने इतरांना मागे टाकत ३.७४ टक्क्यांची बढत घेतली. स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने या रॅलीचे नेतृत्व करताना १०.२२ टक्क्यांची बढत घेतली. तर इतर हिंडाल्को इंडस्ट्रीज, जिंदाल स्टील अँड पॉवर, हिंदुस्तान झिंक आणि टाटा स्टीलने अनुक्रमे ६.९४%, ५.७८% आणि ३.३३% ची वृद्धी दर्शवली. निफ्टी मेटलमध्ये आज १३ स्टॉकमध्ये वाढ झाली तर दोन शेअर्समध्ये नुकसान दिसून आले.
बँकिंग क्षेत्रातही आज गुंतवणूकदारांची सकारात्मक भावना दिसून आली. निफ्टी पॅकचे नेतृत्व आज बंधन बँकेने ६.४ टक्के वाढीने केले. त्यानंतर एचडीएफसीने ४.९१ टटक्के, पीएनबीेने ३.३६ टक्के आणि एसबीआयने ३.१५ टक्क्यांनी बढत घेतली.
अॅक्सिस बँकेने उष्णतेची झळ सोसत ३.५९%ची घसरण घेतली. बीएसई बँकेक्स इंडेक्स, सिटी युनियन बँकेने प्रॉफिट रॅलीचे नेतृत्व करत ८.१७ टक्क्यांची वाढ केली. दिल्ली हायकोर्टाकडून अंतरिम सवलत मिळाल्यानंतर आज इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्समध्येही ८.३७ टक्क्यांची वाढ झाली.
एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रात चढ-उतार कायम:
एफएमसीजी आणि फार्मा या दोन्हींनी ट्रेडिंग सेशनमध्ये संमिश्र निकाल दर्शवले. निफ्टी एफएमसीजीमध्ये टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, जुबिलंट फूड आणि आयटीसीने १.५ टक्क्यांपेक्षा जास्त सकारात्मक रिटर्नस दिले. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, कोलगेट पामोलिव्ह आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीजने १ ते २.५ टक्क्यांपर्यंत घसरण घेतली.
बीएसई एफएमसीजी, क्वालिटीने ट्रेडिंग सेशनदरम्यान ४.८८ टक्क्यांची घसरण घेत या घसरणीचे नेतृत्व केले. व्हेंकीज, पीअँडजी इंडिया, नेसले आणि मेरिको हे शेअर्स आज तणावाखाली दिसले.
निफ्टी फार्मामधील नुकसानीचे नेतृत्व आज टोरेंट फार्माने २.४३ टक्क्यांची घसरण घेत केले. या प्रवाहात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि अल्केम लॅबोरेटरीजने दिवस संपताना अनुक्रमे १.७५ % आणि १.७३% ची घट नोंदवली. अरबिंदो फार्मा, सन फार्मा, कॅडिला हेल्थ यासारख्या इतर स्टॉक्सनी सब-१ टक्क्यांची वृद्धी घेत आपली बाजू बळकट केली.
0 Comments