मुलांसह आठवणींचा खजिना तयार करण्यात गुंतले बाॅलीवूडचे सेलिब्रिटी

शिल्पा शेट्टी, नेहा धूपिया, रणविजय सिंग, करनवीर बोहरा यांचा समावेश


A Bollywood celebrity involved in creating a treasure of memories with children


मुंबई - मुलांना रचनात्मक, निर्मितीक्षम कामात गुंतवून ठेवून हस्तकलेतून सुंदर आठवणी निर्माण करण्याच्या उद्देशाने मॉम्सप्रेसो.कॉमने (https://www.momspresso.com) फेविक्रिएटच्या संयुक्त विद्यमाने 'इंडिया क्राफ्टिंग मेमोरिज' या उपक्रमाची सुरुवात केली आहे.

या उपक्रमाला आता शिल्पा शेट्टी, नेहा धूपिया, रणविजय सिंग, करनवीर बोहरा यांसारख्या नावाजलेल्या सेलिब्रिटींचा पाठींबा मिळाला असून लॉकडाऊनदम्यान मिळालेल्या या अतिरीक्त वेळात ते आपल्या मुलांसह एकत्र बसून हस्तकलेच्या माध्यमातून विविध कलाकृतींची निर्मिती करीत आपल्या मुलांच्या क्रिएटिव्हिटीला चालना देत आहेत.

'कुटुंबातील सर्व सदस्य सध्या घरातच असल्याने कुटुंबीयांसोबतच्या चिरकाल टिकणा-या आठवणी निर्माण करण्याची हीच योग्य वेळ आहे. यावेळी हस्तकलेच्या माध्यमातून विविध कलाकृती तर निर्माण करता येतीलच शिवाय मुलांची पूर्ण ऊर्जा वापरण्यासाठी,

त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तसेच त्यांचे रचनात्मक विचार वाढवण्यासाठी या कलेचा देखील पुरेपूर वापर करता येईल असा विश्वास मॉमप्रेसो.डॉमचे सीओओ प्रशांत सिन्हा यांनी व्यक्त केला.'

A Bollywood celebrity involved in creating a treasure of memories with children

या उपक्रमातून विविध कुटुंबांना नव्या विशेष आठवणी तयार करण्याची संधी मिळेल तसेच त्या इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवरही शेअर करता येतील. फेविक्रिएट याकरिता तज्ञांची मदत घेणार असून हे तज्ज्ञ सोशल मिडियावर दररोज एक रंजक हस्तकला सादर करतील. जेणेकरून पालक घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून मुलांसोबत एखादी कलाकृती तयार करतील.

या उपक्रमात दर आठवड्याला स्पर्धाही असतील. तसेच मॉम्सप्रेसो सोशलवर व्हिलॉग चॅलेंजही असेल, जेणेकरून या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल. या उपक्रमातून मिळालेल्या व्हिडिओद्वारे मॉम्सप्रेसो.कॉम भारतातील हस्तकला आठवणींच्या संग्रहाचा सर्वात मोठा व्हिडिओ तयार करणार आहे.

Tags - A Bollywood celebrity involved in creating a treasure of memories with children

Post a Comment

0 Comments