मुलांना विविध छंद जोपासण्यास उद्युक्त करावे
पुणे - कोरोनाव्हायरस हे एक जागतिक संकट आहे. दिवसेंदिवस या आजाराबाबतची परिस्थिती गंभीर वळण घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाव्हायरसच संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. जेव्हा संपूर्ण जग भीती व चिंताग्रस्त वातावरणात असते.
लॉकडाउनचा म्हणजे आपण जिथे आहात तिथेच रहायला पाहिजे. अशा वेळी पालकांना चिंता वाटू लागते. सर्वानाच घरीच राहण्याची सूचना केली जाते पण त्यामुळे मुलांना मात्र कंटाळा येऊ शकतो.आपल्या मुलांना निरोगी आयुष्यासाठी प्रोत्साहित करणे आणि लॉकडाऊन दरम्यान मुलांना विविध छंद, चांगल्या सवयी जोपसण्यात गुंतवून ठेवणे नक्कीच फायदेशीर ठरेल.
लॉकडाऊन दरम्यान मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी वापरा हे सोपे पर्याय
चांगल्या सवयी लावा :- मुलांना चांगल्या सवयी लावा. रोजच्या कामाचे महत्त्व स्वतःहून त्यांना पटवून द्या. जेणेकरून मुलांना स्वावलंबी करता येईल. त्यांना त्यांच्या रोजच्या जबाबदा-या कळतील. त्यांना पुस्तक वाचण्यात मदत करा, त्यांच्या बरोबर कोडी सोडवा जे बुध्दीला चालना देणारे खेळ खेळा, गाणी-गोष्टी सांगा, सामान्यज्ञान वाढविणारे वाचन करून घ्या.त्यांच्यातील कलागुणांना वाव द्या : मुलांना त्यांच्यातील सुप्त कलागुणांना चालना देण्याची संधी द्या. हस्तकला शिकवा तसेच आवडता छंद जोपासण्यात त्यांना मदत करा. त्यांना चित्र काढणे, ते रंगविणे, विणकाम करायला शिकवा तसेच रोजनिशी लिहायला लावा.
आपल्या मुलाच्या त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देत बेडरूममध्ये सजावट करा किंवा घरात त्यांना स्वतःला त्यांची खोली सजवू द्या. चित्रकला आणि ओरिगामी शिकणे हे देखील मुलांना क्रिएटिव्ह करू शकतात. आपल्या मुलांबरोबर शैक्षणिक कार्यक्रम पहा. पेंटिंग, पाककला, टाइपिंग करणे इत्यादी नवीन कौशल्ये शिकण्यासाठी लॉकडाउनच्या वेळेचा सदुपयोग करा.
मुलांसह काही दर्जेदार वेळ घालवा: आपल्या मुलाचा स्क्रीन टाइम मर्यादित करा. त्याऐवजी, आपल्या मुलाबरोबर काही चांगला वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. घरात तंत्रज्ञान मुक्त झोन तयार करा. असे केल्याने आपल्या मुलाशी असलेले आपले नाते आणखी मजबूत होऊ शकते. कॅरोम, बुद्धीबळ, लुडो किंवा यूएनओ सारखे काही घरातील खेळ खेळा.
व्यायामाचे महत्त्व पटवून द्या: घरी असताना आपल्या मुलांना व्यायामाचे महत्त्व पटवून रोज व्यायम करण्यास प्रोत्साहित करा. ध्यान करणे, योगसाधना किंवा बागकाम करण्यास मदत करा. व्यायाम करताना त्यांच्या जबरदस्ती न करता त्यांना त्यातून आऩंद घ्यायला शिकवा.
दैनंदिनी लिहीण्यास मदत करा: आपल्या मुलास रोजनिशी लिहीण्यास मदत करा. त्यांना त्यांच्या भावनांबद्दल मनमोकळेपणाने लिहू द्या. त्यांना काय आवडते, छंद कोणते किंवा भविष्यात काय करण्याची त्यांची इच्छा आहे याबाबत त्यांना या वहीमध्ये लिहीण्यास सांगा. या गोष्टी त्यांना लॉकडाऊन दरम्यान आनंदी आणि सकारात्मक राहण्यास नक्कीच मदत करतील.
संतुलित आहार : आपल्या मुलांना पोषक आहार द्या. त्यांना आवडणारे पदार्थ बनवायला शिकवा. त्यांच्याबरोबर भाज्यांचे सूप, कोशिंबीरी आणि स्नॅक्स बनवण्याचा प्रयत्न करा.
अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
डॉ तुषार पारेख,
कन्सल्टंट निओनॅटोलॉजिस्ट
आणि बालरोग तज्ञ, मदरहुड हॉस्पीटल, पुणे
0 Comments